
Pune : पुण्यातील दौंड शहरात अत्यंत हृदयद्रावक घटना घडली असून, रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामादरम्यान रोड रोलरखाली सापडून चार वर्षांच्या चिमुकल्या मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण दौंड शहर हादरले असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. आर्यन जाधव असे चिमुकल्याचे नाव असून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना दौंड शहरातील जनता कॉलनी परिसरात, सेंट सेबिस्टियन हायस्कूलच्या मागील रस्त्यावर घडली.
रोडरोलरखाली चिमुकला सापडला
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड भागातील या परिसरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याचे डांबरीकरण सुरू होते. आर्यन जाधव याची आई याच ठिकाणी मजूर म्हणून काम करत होती. काम सुरू असतानाच आर्यन हा रस्त्याजवळच खेळत असताना, भरधाव वेगाने मागे घेत असलेल्या रोड रोलरखाली तो सापडला. रोडरोलर चालकाचा वेग अत्यंत जास्त होता. लवकरात लवकर काम उरकण्याच्या नादात चालकाने आवश्यक ती खबरदारी न घेता रोलर फिरवला आणि क्षणात आर्यनचा जागीच चिरडून मृत्यू झाला. या घटनेनंतर रोडरोलर चालक घटनास्थळावरून पळून गेल्याची माहिती आहे.
धक्कादायक बाब म्हणजे, डांबरीकरण सुरू असताना संबंधित रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला नव्हता. तसेच काम सुरू असल्याचे कोणतेही सूचनाफलक लावण्यात आले नव्हते. कठडे, बॅरिकेड्स किंवा सुरक्षात्मक उपाययोजना पूर्णपणे अनुपस्थित होत्या. सार्वजनिक बांधकाम विभागाने ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या कामावर कोणतीही देखरेख ठेवलेली नव्हती. तसेच कामाच्या ठिकाणी विभागाचे कोणतेही जबाबदार अधिकारी किंवा ठेकेदारांचे सुपरवायझर उपस्थित नव्हते. आर्यन जाधव याच्या मृत्यूनंतर देखील संबंधित अधिकारी किंवा ठेकेदार घटनास्थळी फिरकले नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.
चालक फरार, पोलिसांकडून शोध सुरु
या भीषण घटनेमुळे एका मजुरी करणाऱ्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आणि ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे एका निरागस चिमुकल्याला आपला जीव गमवावा लागल्याची भावना नागरिक व्यक्त करत आहेत. याप्रकरणी संबंधित ठेकेदार, रोडरोलर चालक तसेच सार्वजनिक बांधकाम विभागातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय प्रतिनिधींनी केली आहे. दोषींवर गुन्हे दाखल करून पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशीही मागणी होत आहे. दरम्यान, दौंड पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला असून फरार रोडरोलर चालकाचा शोध सुरू आहे.
शहर
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- Pune : महिला दिनानिमित्त PMPML ची खास भेट; फक्त 500 रुपयांत ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळांची सफर
- प्रवाशांना दिलासा: नांदेड-मुंबई वंदे भारत एक्सप्रेसचा वेग वाढला, प्रवासाचा कालावधी अर्ध्या तासाने कमी
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
महाराष्ट्र
- उन्हाळ्यासाठी खास: १० मिनिटांत घरच्या घरी तयार करा महाराष्ट्राचे पारंपरिक चविष्ट पियूष
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- महाराष्ट्रातील ६७ बिबटे ६ राज्यांमध्ये पाठवण्याचा वन विभागाचा निर्णय; गुजरातला सर्वाधिक, संघर्षावर उपाय.
- इराण-इस्रायल संघर्षात मुंबईच्या खलाशाचा बळी; सोळंकी कुटुंबावर महिन्याभरात दुसरे दुःख
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- नवनीत गुर्जर यांचा कॉलम:ट्रम्प, टेरिफ आणि ‘फीनिक्स’ काँग्रेस
- Pune ZP Election : अजित दादांच्या निधनानंतरची पहिलीच निवडणूक; पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची कसोटी, विजय मिळाला तरी पुढे काय?
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
इतर
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी
- पुण्यात ठाकरे गटाचे नेते वसंत मोरे यांच्यावर ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल, पत्रकार परिषदेतील वक्तव्य भोवले
- त्वचेला नैसर्गिक चमक हवी? बीटच्या साध्या उपायांनी मिळवा गुलाबी आणि निरोगी कांती!
- सूर्यप्रकाशापासून त्वचेचे संरक्षण: सनस्क्रीन वापरताना या महत्त्वाच्या चुका टाळा!
मनोरंजन
- बिग बॉस मराठी 6: ‘पॉवर की’ टास्कमध्ये वाइल्डकार्ड संकेतची रणनीती यशस्वी; पुढील खेळाची उत्सुकता शिगेला.
- Shahid Kapoor : शाहिद कपूर आणि मीरा राजपूतने पुन्हा खरेदी केलं 'लग्जरी अपार्टमेंट', आलिशान किंमत एकून व्हाल थक्क
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
देश विदेश
- Uttar Pradesh : जत्रेतून १६ वर्षीय तरुणीचे अपहरण, गुंगीचे औषध पाजून सामूहिक बलात्कार
- भारत-इंग्लंड सेमीफायनल: साक्षी धोनीच्या ‘कॅच’वरील उत्साहाने उपस्थितांचे लक्ष वेधले, धोनीलाही हसू आवरेना
- स्टायलिश आणि हटके लूकसाठी केसांची उंचीवरील वेणी हेअरस्टाईल: ट्रेंडिंग पर्यायांची सविस्तर माहिती
- सचिनपुत्र अर्जुन तेंडुलकर विवाहबंधनात; मुंबईतील भव्य सोहळ्याला बॉलिवूड-क्रिकेट दिग्गजांची हजेरी



























Subscribe to my channel



1 thought on “Pune : रस्त्यावर खेळताना घडला अनर्थ; रोडरोलरखाली चिमुकल्याचा मृत्यू, आईच्या डोळ्यांसमोर लेकाचा करुण अंत; पुणे हादरलं |”