
Pune : पुण्यातील सर्वाधिक वर्दळीच्या लक्ष्मी रस्ता, जंगली महाराज रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता (फर्ग्युसन कॉलेज), बालेवाडी हायस्ट्रीट, विमाननगर रस्ता आणि बिबवेवाडी येथील मुख्य रस्ता अशा सहा ठिकाणी ‘पे अँड पार्क’ योजना राबवण्यासाठी महापालिकेच्या निविदांना प्रतिसादच मिळत नसल्याने त्याला पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली असून, आचारसंहिता संपल्यानंतर याबाबतचा पुढील निर्णय घेतला जाणार आहे.
महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने पार्किंग धोरणाला 2018 मध्ये मान्यता दिली होती. त्यानंतर सात वर्षांनी ‘पे अँड पार्क’ला मुहूर्त लागला असून, दुचाकींसाठी दर तासाला चार रुपये आकारण्यात येणार आहेत. या रस्त्यांवर सहा हजार 344 दुचाकी आणि 618 चारचाकींचे पार्किंग करणे शक्य असून, त्यामधून महापालिकेला सुमारे 12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळणार असल्याचे निविदांवरून स्पष्ट झाले आहे.
|
|
शहरातील रस्त्यांवर बेशिस्तपणे वाहने पार्क होत असल्याने कोंडीचे प्रकार घडत आहेत. लक्ष्मी रस्त्यावर स्थानिक व्यावसायिकांच्या कर्मचाऱ्यांची वाहने सकाळीच पार्क करण्यात येत असल्याने खरेदीसाठी येणाऱ्या नागरिकांना पार्किंग उपलब्ध होत नाही. येथील महापालिकेच्या वाहनतळावर दुचाकीसाठी प्रतितास 20 रुपये आकारण्यात येतात. महापालिकेने ताशी तीन रुपये दर निश्चित केला असला, तरी वाहनतळ चालकांकडून मनमानी करण्यात येते. अशा परिस्थितीत या रस्त्यावर नागरिकांना अधिकाधिक पार्किंग उपलब्ध होणे गरजेचे आहे. महापालिका प्रशासनाने आठ वर्षांनंतर या रस्त्यांवर पार्किंग शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला असला, तरी त्याच्या अंमलबजावणीत अडथळ्यांची शर्यत सुरू झाली आहे.
शहरातील रस्त्यांवर सुमारे दोन ते तीन लाख बेवारस वाहने पडून असल्याची शक्यता महापालिका आयुक्त नवलकिशोर राम यांनी नुकतीच व्यक्त केली आहे. वर्दळीच्या रस्त्यांवर ठरावीक व्यक्तींकडून तासन् तास वाहने पार्क करण्यात येत असल्याने इतर वाहन चालकांना पार्किंग मिळत नसल्याचे प्रकार सर्रास होत आहेत. या पार्श्वभूमीवर पार्किंग धोरणाची अंमलबजावणी करण्याची मागणी प्रशासनातून जोर धरत होती. वाहतूक पोलिसांकडूनही ‘पे अँड पार्क’साठी आग्रह धरण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर सात वर्षे प्रलंबित असलेल्या प्रस्तावावर निर्णय घेऊन प्रथमत: सहा रस्त्यांवर ‘पे अँड पार्क’ सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शहर
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
महाराष्ट्र
- नंदितेश निलय यांचा कॉलम:चांगले आरोग्य आनंद देते अन् आनंदी मन पुन्हा एक नवे बालपण
- डॉ. अरुणा शर्मा यांचा कॉलम:आपल्यासमोर शाश्वत रोजगार निर्माण करण्याचे आव्हान
- Maharashtra Weather : महाराष्ट्रावर उष्णतेच्या लाटेचं संकट; विदर्भात सर्वाधिक तापमान, हवामान खात्याचा ‘यलो’ अलर्ट
- शेखर गुप्ता यांचा कॉलम:अफगाणिस्तानशी भिडल्याने पाक घेरला गेलाय
गुन्हा
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती






















Subscribe to my channel


1 thought on “Pune : दुचाकीसाठी तासाला फक्त ४ रुपये! पुण्यातील ‘या’ ६ रस्त्यांवर सुरू ‘पे अँड पार्क’; महापालिकेची सुविधा कुठे आणि कशी?”