Pune News : पुण्यातील धक्कादायक प्रकार! शववाहिनी उपलब्ध नसल्यामुळे मृतदेह रिक्षातून नेण्याची वेळ

कॅन्टोन्मेंट - शववाहीनीला चालकच नाही, शवागारही बंद रात्री कर्मचारी फोनच उचलत नाहीत, कॅन्टोन्मेंटच्या वाहन विभागाची दयनीय अवस्था असल्याने शववाहिनी ही उपलब्ध नसल्याने वृद्धेचा मृतदेह रिक्षातून नेण्याची गंभीर बाब नातेवाईकांवर आली वेळ आली आहे.

आरोग्य सेवेसाठी शक्यतो महाराष्ट्र बाहेर यू पी बिहार सारख्या राज्यात रुग्णवाहिका किंवा शववहिनी नसल्याने रुग्ण किंवा मृत शरीरास खांद्यावर, हातगाडीवर सायकल वर रिक्षामध्ये शेकडो किमी प्रवास केल्याची घटना अनेक वेळा आपण पाहिली असेल.

मात्र, महाराष्ट्र राज्यासारखा पुणे शहरात शववाहिनी उपलब्ध नसल्याने मृत शरीर चक्क रीक्षामध्ये सरकारी रुग्णालयात घेऊन जाण्याची वेळ पुणे कँटोन्मेंट मधील नागरिकांवर आल्याने बोर्ड परिसरात नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट उसळली आहे.

त्यामुळे याप्रकरणी मनसेचे पुणे कॅन्टोन्मेंट बोर्ड विभाग अध्यक्ष शिरीष आगुरेड्डी यांनी बेजबाबदार डॉक्टर अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. रुक्मिणी मोहिते वय वर्षे 95, यांचे सोमवारी दि. 12 मे रोजी रात्री 10 वा. वृद्ध आजीचे निधन झाल्यावर नवा मोदीखाना कॅम्प येथून केवळ ५०० मिटर अंतरावर असलेल्या पटेल रुग्णालयात शवागार मध्ये ठेवण्यासाठी जायचे असल्याने नातेवाईकांनी बोर्डाच्या धोबी घाट येथील वाहन तळ गाटले, मात्र त्याठिकाणी शववाहीनी चालवण्यासाठी चालकाच रात्री उपलब्ध नसल्याचा भयंकर प्रकार समोर आला.

त्यादरम्यान वाहनतळ प्रमुख बंडू गुजर आणि सहाय्यक अशपाक शेख यांना फोन केला असता फोनच बंद आला. शेवटी नाईलाजाने शवाला रिक्षा मधून पटेल रुग्णालयाच्या नव्याने उभारण्यात आलेल्या शवागारात घेऊन जाण्यात आले असता शवागारही बंद असल्याचे गंभीर प्रकरण समोर आले. याविषयी रुग्णालयातील परिचारिका म्हणाली की, इलेक्ट्रिशियनच्या सांगण्यानुसार शवागारात तांत्रिक बिघाड आला आहे.

त्यामुळे तुम्ही बॉडी हलवा असे सांगण्यात आले. अशा प्रसंगी हॉस्पिटल येथे निवासी असलेल्या अधिष्ठाता डॉ. उषा तपासे यांच्या बंगल्यावर गेलो असता त्यांच्या बंगल्याला कुलूप लावल्याचे निदर्शनास आले. शेवटी पुन्हा आजींना रिक्षा मधूनच ससून रुग्णालयात शवागारात हलविण्यात आले. रुग्णालयातून कुठल्याही प्रकारची सहायता न मिळाल्याच्या आरोप आजीचे नातू विक्रम मोरे यांनी केला आहे.

म्हणूनच कॅन्टोन्मेंट पालिकेत विलीन करा -

जर का शवावहिनी, शवागार सारख्या सामान्यआणि अतिमहत्त्वाच्या सुविधा जर कॅन्टोन्मेंट बोर्ड देऊ शकत नसेल, त्यामुळे समस्या माणसाला जर एवढं त्रास होत असेल तर कॅन्टोन्मेंट बोर्ड महापालिकेत विलीन करा असा मुद्द मृताचे नातेवाईक अक्षय चाबुकस्वार यांनी मांडला.

मात्र निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ उषा तपासे यांनी हे सर्व फेटाळून लावले आहे. त्यावर तपासे म्हणाल्या की, माझ्याकडे कोणीही विचारण्यास आले नाही. मी ऑन ड्युटी रुग्णालयातच असते. या प्रकरणात माझी व माझ्या स्टाफची कुठल्याही प्रकारची चूक नाही. शववाहिनीची कुठलीही मागणी त्यांनी केली नाही. राजकीय डावपेच करून हॉस्पिटला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सीएसआर फंडातून रुग्णांना लागणाऱ्या सर्व गोष्टी आम्ही पुरवण्याच्या प्रयत्नात असतो.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply