Pune : पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेरच्या खड्ड्यांचा हार घालून कोथरूडकराचा निषेध;

पुणे : कोथरुड भागात रस्त्यावर पडलेले खड्डे पुणे महापालिकेकडून वेळीच दुरूस्त केले जात नाहीत.यामुळे प्रवाशांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या कार्यालयासमोर, महर्षी कर्वे पुतळा चौकात बुधवारी एका व्यक्तीने खड्याला हार घालून व रांगोळी काढून तसेच हात जोडून भर उन्हात आंदोलन केले.

आंदोलक संतोष पंडीत म्हणाले, "मी दीड ते दोन तास झालं या ठिकाणी उभा आहे. रस्त्याला पडलेले खड्डे व त्याचे दुरुस्तीचे काम पुणे महानगरपालिका करत नाही. गल्लीपासून दिल्लीपर्यंत ज्या पक्षाला पुणेकरांनी सत्ता दिली, त्या पक्षाचे नेतेही आमच्याकडे लक्ष देत नाहीत हे दुर्दैव आहे. नो पार्किंग मधून गाडी उचलली तर ७८६ रुपये दंड आकारला जातो, झेब्रा क्रॉसिंग वर गाडी असेल आणि त्याचा फोटो काढला तर पाचशे रुपये दंड आकारला जातो. रस्त्याचा कर, टोल घेतला जातो.

सर्व गोष्टीची कर आकारणी सर्वसामान्यांकडून शासन घेते, तरीही सर्वसामान्यांना सुविधा मिळत नसेल तर मी माझ्यावर गुन्हा दाखल करून घ्यायला ही तयार आहे. मी आजपर्यंत पुणे शहरातील जवळपास ८० ते ९० खड्डे दुरुस्त करायला लावले आहेत. पालकमंत्री हे काय असतं? हे विसरलो आहे. देशात फक्त पंतप्रधानच काम करतात, त्यांचे नेते पंतप्रधानांच्या फोटोचा वापर करतात. त्यांना जनतेच्या कोणत्याही गोष्टीचं सोयर, सुतक पडलेलं नाही. त्यांचं एवढंच काम आहे दुसऱ्या पक्षातील नेते फोडा आणि आपला पक्ष मोठा करा.

"गोल चेंबर असेल तर आमच्याकडे येत नाही. चौकोनी चेंबर असेल तर आमच्याकडे येतं. तिथं दोन प्रभागात विभागणी झाली आहे. तरीही आमचे कर्मचारी त्या ठिकाणी पाठवून चौकाशी करायला सांगितले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply