Pune : पुण्यातील नामांकित कॉलेजबाहेर रॅगिंगचा धक्कादायक प्रकार; चौघांकडून विद्यार्थ्याला बेदम मारहाण, थरारक VIDEO व्हायरल

Pune : पुणे शहर विद्येचं माहेरघर मानलं जात. मात्र याच विद्येच्या माहेरघरात विद्यार्थी सुरक्षित आहेत का? असे प्रश्न पाडणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील वाघोली येथील BJS कॉलेजच्या बाहेर चार जणांनी एका विद्यार्थ्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. रॅगिंगच्या संतापजनक घटनेनंतर परिसरात आणि विद्यर्थ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे असामाजिक घटकांचे धाडस वाढत असल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. या घटनेनंतर संबंधितांवर तात्काळ कठोर कारवाई करावी. तसेच कॉलेज परिसरात नियमित पोलीस गस्त व कायमस्वरूपी बंदोबस्त तैनात करावा, अशी मागणी नागरिक, पालक आणि विद्यार्थ्यांकडून होत आहे.

PMC : चार वर्षांनंतर महापालिकेची निवडणूक रणधुमाळी; २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

या मागण्यांसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहर सरचिटणीस प्रशांत जमदाडे यांनी पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन सादर केले आहे. दरम्यान, वाढत्या गुंडगिरीच्या घटनांमुळे परिसरातील नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली असून पोलिस प्रशासन याबाबत कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *