Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये अवजड वाहनांवर कडक नियम लागू; वाहतूक पोलिसांची मोठी घोषणा, अंमलबजावणी आजपासून सुरू

Pune : पुण्यात गेल्या काही दिवसांपासून अपघातांचे सत्र सतत वाढत आहे. त्यामुळे PMRDA आणि पुणे वाहतूक पोलिसांनी मिळून वाहतूक नियंत्रणासाठी काही महत्त्वपूर्ण नियमावली तयार केल्या असून, त्यातील एका नियमाची अंमलबजावणी आजपासून सुरू होत आहे.

3 डिसेंबरपासून पिंपरी चिंचवडमधील महामार्ग आणि अंतर्गत रस्त्यांच्या सेवा रस्त्यांवर धावणाऱ्या अवजड वाहनांसाठी 30 किमी प्रतितासाची वेगमर्यादा लागू करण्यात आली आहे. मंगळवारी पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाने याबाबत माहिती देऊन ही नवीन वेगमर्यादा जाहीर केली. “नवीन वेगमर्यादा 3 डिसेंबरपासून लागू होईल. अग्निशमन दल, रुग्णवाहिका आणि पोलिसांसारख्या आपत्कालीन सेवांची वाहने वगळता सर्व अवजड वाहनांना ही मर्यादा बंधनकारक असेल,” असे पिंपरी चिंचवड पोलिसांचे उपायुक्त (डीसीपी – वाहतूक) विवेक पाटील यांनी सांगितले.

Pune : हाताला लावलेला पार्टी बँड, गाडीतून उतरताना पाय अडकला… टायर निखळलं तरीही पुण्यात मद्यधुंद चालकाचा धक्कादायक ‘कार’नामा; VIDEO

पुण्यात वाढत्या अपघातांवर आळा घालण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतूक पोलिसांनी यापूर्वीच सकाळी 8 ते 11 आणि सायंकाळी 2 ते 10 या वेळेत अवजड वाहनांच्या वाहतुकीवर पूर्ण बंदी लागू केली आहे. तरीही अनेकदा या नियमांचे उल्लंघन होत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण कमी न होता उलट वाढतच आहे.

या परिस्थितीवर उपाय म्हणून गेल्या आठवड्यात पिंपरी चिंचवड वाहतूक पोलीस,आरटीओ आणि PMRDA यांनी एकत्र बैठक घेऊन अवजड वाहनांसाठी 30 किमी प्रतितास अशी वेगमर्यादा ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता, त्यालाच आता मंजुरी देण्यात आली आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *