Pune : विद्येचं माहेरघर की अमली पदार्थांचा हॉटस्फॉट! पुण्यात ३६ लाख रुपयांचे "म्याव म्याव" ड्रग्स जप्त

Pune News : पुणे शहर सध्या अंमली पदार्थांचे हॉटस्पॉट ठरत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. पुण्यात अंमली पदार्थ सापडल्याची अनेक प्रकरण उघडकीस येत आहेत. नुकतेच पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून ३६ लाख रुपयांचे "म्याव म्याव" ड्रग्स जप्त केले आहे. पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथक 1 कडून ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पुण्यातील लोणी काळभोर परिसरातून ३६ लाख रुपयांचे "म्याव म्याव" ड्रग्स जप्त केले करण्यात आले आहे. उरळी कांचन समोरील सार्वजनिक रोडवर एक तरुण पांढऱ्या व कॉफी रंगाचे मफैड्रोन व बंटा गोळ्या या अमली पदार्थाची त्यांच्या ओळखीच्या लोकांना विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

याच माहितीच्या आधारे पोलिसांनी जितेंद्र सतीशकुमार दुवा ( वय,४०) या मुळच्या दिल्लीच्या असलेल्या तरुणाची झडती घेतली. यावेळी त्याच्याकडून एकूण ३६ लाख रुपये किमतीचे अंमली पदार्थ आणि रक्कम जप्त करण्यात आली. यामध्ये पांढऱ्या रंगाचे एम डी 20 ग्रॅम 670 मिलिग्रॅम कॉफी कलर चे 80 ग्रॅम 340 मिलिग्रॅम एम डी व 610 ग्रॅम बंटा गोळ्या या पदार्थांचा समावेश आहे.

या प्रकरणी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात युवकाविरुद्ध गुन्हा दाखल असून त्याला अटक केली आहे. पोलिस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. दरम्यान, पुण्यात गेल्या १५ दिवसात सातत्याने अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याच्या घटना समोर येत आहेत. एल एस डी, म्याव म्याव, मेथॅम्फेटामाइन यांसारखे अमली पदार्थ विक्रीचे अनेक प्रकरणे उघडकीस आले आहेत. त्यामुळे पुणे शहर ड्रग्जच्या विळख्यात असल्याची चर्चा होताना दिसत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply