Pune : शादी डॉट कॉमवर ओळख; नंतर लग्नाचे आमिष दाखवत...; पिंपरी चिंचवडमधील महिलेसोबत नको ते घडलं, तिघांना अटक

Pune : शादी डॉट कॉम या वेबसाईटवरुन महिलेशी ओळख करुन तिची जवळपास ३ कोटी १७ लाख रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी चिंचवड शहरात उघडकीस आला आहे. पिंपरी चिंचवड शहर सायबर पोलिसांनी अतिशय कौशल्यपूर्ण तांत्रिक तपास करत या प्रकरणातील तीन आरोपींना दिल्ली येथून बेड्या ठोकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपींनी शादी डॉट कॉमवरुन पीडित महिलेशी ओळख केली. त्यानंतर आरोपींनी महिलेला लग्नाचे आमिष दाखवले, तिचा विश्वास संपादन केला. त्यानंतर व्यवसायात तोटा झाल्याचे कारण देत महिलेकडून पैसे घेतले. कधी कच्चामाल घेण्यासाठी भांडवल, तर कधी विमानतळावर अधिकाऱ्यांनी पकडल्याचे सांगत पीडितेला फसवले.

Pune : AI आधारित स्मार्ट ई-बस लवकरच ST च्या ताफ्यात दाखल होणार, परिवहन मंत्र्यांची मोठी घोषणा

आरोपींनी पीडीत महिलेकडून जवळपास ३ कोटी १६ लाख ७८ हजार रुपये उकळल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. महिलेकडून पैसे मिळवल्यानंतर आरोपींनी ते पैसे वेगवेगळ्या बँकांच्या ३०० ते ४०० बँक खात्यांमध्ये वळवले. पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या सायबर विभागातील अधिकाऱ्यांनी शिताफीने या गुन्ह्यातील आरोपींना पकडले.

लग्नाचे आमिष दाखवून फसवणूक करणे, महिलेला ३ कोटी १७ लाख रुपयांचा गंडा घाळणे या प्रकरणी पोलिसांनी रंजीत मुन्नालाल यादव (वय २७ वर्ष), सिकंदर मुन्ना खान (वय २१ वर्ष) आणि बबलू रघुवीर यादव (वय २५ वर्ष) यांना दिल्ली येथून बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणामुळे पिंपरी चिंचवडमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply