Pune : किल्ला चढताना छातीत तीव्र वेदना, पुण्यातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्तांचा सिंहगडावर हार्ट ॲटॅकनं मृत्यू

Pune : पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सिंहगड किल्ला फिरायला गेलेले असताना निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजकुमार गायकवाड यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. गायकवाड हे आतकरवाडीमार्गे सिंहगड किल्ल्यावर सहकाऱ्यांसह फिरायला गेले होते. किल्ला फिरताना त्यांना अचानक छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांनी सहकाऱ्यांना सांगितलं, परंतु काही वेळातच ते बेशुद्ध पडले. त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टर मित्राने तातडीने त्यांच्यावर प्राथमिक उपचार केले, परंतु गायकवाड यांनी प्रतिसाद दिला नाही.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांना स्ट्रेचरद्वारे किल्ल्यावरून खाली आणण्यात आलं आणि तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं. या घटनेची नोंद हवेली पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यू म्हणून करण्यात आलेली आहे.

Jalna Heavy Rain : परतूर मंठा तालुक्यात मुसळधार अवकाळी पाऊस; शेतातही साचले पाणी

सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेल्यानंतर पुणे पोलीस दलातील निवृत्त सहायक पोलीस आयुक्त राजकुमार गायकवाड (वय ६२) यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. या घटनेने पोलीस दलात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेबाबत दिलेल्या माहितीनुसार, गायकवाड हे आतकरवाडीमार्गे सिंहगड किल्ल्यावर सहकाऱ्यांसह फिरायला गेले होते. किल्ला चढत असताना त्यांच्या छातीत तीव्र वेदना जाणवू लागल्या. त्यांनी याबाबत सहकाऱ्यांना माहिती दिली, परंतु काही समजण्याच्या आत ते बेशुद्ध पडले. त्यांच्यासोबत असलेल्या डॉक्टर मित्राने तातडीने प्राथमिक उपचार केले, परंतु गायकवाड यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.

घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी समाधान पाटील आणि वनरक्षकांनी घटनास्थळी धाव घेतली. गायकवाड यांना स्ट्रेचरद्वारे किल्ल्यावरून खाली आणण्यात आले आणि तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलं.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply