Pune News : दारू वेळेवर न आणून दिल्याचा वाद विकोपाला, काका- पुतण्यानं एकाला जागीच संपवलं; पुण्यात खळबळ

Pune News : दारू आणून न दिल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून एका तरूणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना पुण्यातील भवानी पेठेतील कासेवाडीत घडली आहे. या प्रकरणाची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर काका - पुतणे या दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.

गोपाळ जयराम आचार्य (२५, रा. कासेवाडी, भवानी पेठ) असे मृत तरूणाचे नाव आहे. तर, अमिर शेख आणि दानिश अली शेख असे आरोपींची नावे आहेत. आरोपी नात्याने काका पुतणे असल्याची माहिती समोर आली आहे. घटनेच्या दिवशी गोपाळ आचार्य याचा आरोपींशी दारू आणून देण्यावरून वाद झाला.

वाद विकोपाला गेला. त्यानंतर हाणामारीला सुरूवात झाली. गोपाळवर आरोपींनी शस्त्रांनी वार करण्यास सुरूवात केली. या बेदम मारहाणीत गोपाळचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती गोपाळच्या कुटुंबाला मिळाल्यानंतर जयराम लोकनंदन आचार्य (५१) गोपाळच्या वडिलांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

खडक पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तपास करून आरोपींना अटक केली. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply