Pune : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त ब्रह्माकुमारी संस्थेद्वारे ध्यान सत्राचे आयोजन

Pune : जागतिक पृथ्वी दिना" निमित्त, आध्यात्मिक संघटना ब्रह्माकुमारीजने पृथ्वी मातेसाठी सकारात्मक ऊर्जा आणि सद्भावना पसरवण्यासाठी एक विशेष ध्यान सत्र आयोजित केले होते.

संस्थेच्या पिसोळी स्थित जगदंबा भवन परिसरातील जनक स्टेडियम मध्ये हा कार्यक्रम झाला, ज्यामध्ये संस्थेच्या जगदंबा भवन या केंद्रात नियमितपणे येणाऱ्या सुमारे ५० साधकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे संचालन जगदंबा भवनच्या सह-संचालिका ब्रह्माकुमारी शीतल यांनी केले. ब्र.कु. शीतलने यांनी सर्वांना एका शक्तिशाली ध्यान सत्राद्वारे मार्गदर्शन केले आणि सर्वांनी मिळून राजयोग ध्यानसाधनेद्वारे प्रकृतीमध्ये सकारात्मक ऊर्जेचे प्रकंपन पसरवले, आणि पृथ्वीमाते बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Pune : समाविष्ट गावांतील बंधारे, तलावांचे पालिकेकडून संरक्षण; अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांची माहिती

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांनी पृथ्वी मातेचे रक्षण आणि संगोपन करण्याची प्रतिज्ञा घेतली, ज्यामुळे उपस्थित सर्वांसाठी हा दिवस प्रेरणादायी आणि संस्मरणीय ठरला.

हा कार्यक्रम या वस्तुस्थितीची एक अभिव्यक्ती होती की, आंतरिक शांती आणि सकारात्मक विचारसरणीद्वारे पृथ्वीच्या संवर्धनात महत्त्वपूर्ण योगदान दिले जाऊ शकते.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply