Pune : शासकीय नोकरीच्या अमिषाने फसवणूक, महसूल विभागातील लिपिकासह दोघे अटकेत; बनावट नियुक्तीपत्र जप्त

Pune : महसूल, पोलीस आणि वनविभागात नोकरीच्या आमिषाने फसवणूक करुन लाखो रुपये उकळणाऱ्या एकाला गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. आरोपीने महसूल सचिव असल्याची बतावणी केली होती. आरोपीला बनावट नियुक्तीपत्रे देण्यासाठी पुण्यातील महसूल कार्यालयातील लिपिक सामील असल्याचे उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. महादेव बाबुराव दराडे (वय ३२, सध्या रा. वाकड, मूळ. रा. धाराशिव) आणि रणजित लक्ष्मण चौरे (वय ३५, सध्या रा. धायरी. मूळ. रा. बीड) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. चौरे हा महसूल कार्यालयात सहायक लिपिकआहे. याबाबत एका तरूणाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनूसार दराडे याच्याविरुद्ध दह लाख रुपये घेवून फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार,आरोपी दराडे जमीन खरेदी विक्रीचे काम करतो. कामानिमित्ताने शासकीय कार्यालयात त्याची ये-जा होती. त्याने अनेकांकडे महसूल सचिव असल्याची बतावणी केली होती. तरुणाचा एका परिचिताच्या माध्यमातून दराडे याच्याशी ओळख झाली. त्यानंतर दराडेने तरूणाला पोलीस उपनिरीक्षक पदावर नियुक्ती करतो, असे सांगून वेळोवेळी दहा लाख रूपये घेतले. या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेकडून सुरू होता. दरम्यान पोलीस कर्मचारी उज्ज्वल माेकाशी यांना मिळालेल्या माहितीनूसार दराडे याला अटक करण्यात आली. त्याची मोटार, तसेच वाकड येथील घरातून पोलिसांनी बनावट कागदपत्रे जप्त केली. तेथून बनावट नियुक्तीपत्रे जप्त करण्यात आली. दराडे राज्यातील पंधरा ते वीस तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता आहे.

Pune : अनामत रक्कम ‘दीनानाथ’ला महागात? आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून नियमांच्या उल्लंघनाची तपासणी



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *