Pune : अनामत रक्कम ‘दीनानाथ’ला महागात? आरोग्य विभागाच्या चौकशी समितीकडून नियमांच्या उल्लंघनाची तपासणी

Pune : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने गर्भवतीला दाखल करून घेण्यासाठी १० लाख रुपये अनामत रक्कम मागितली होती. रुग्णाला आपत्कालीन स्थितीत रुग्णालय अशा प्रकारे पैसे मागू शकत नाही. त्यामुळे गर्भवती रुग्णालयात गेली त्या वेळी तिच्यासाठी आपत्कालीन स्थिती होती का, याची तपासणी राज्याच्या आरोग्य विभागाच्या समितीने शनिवारी केली.

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी उपचारास नकार दिल्याने ईश्वरी (तनिषा) भिसे या गर्भवतीचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला आहे. रुग्णालयानेही याप्रकरणी १० लाख रुपयांची अनामत रक्कम मागितल्याची कबुली दिली आहे. या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने शुक्रवारी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयासह सूर्या हॉस्पिटल आणि मणिपाल हॉस्पिटलला भेट देऊन चौकशी केली होती.

Pune : राज्यातील शाळा, अंगणवाड्यांचे ‘जिओ टॅगिंग’, एक कोटी ४ लाख रुपये खर्च करण्यास मंजुरी

आपत्कालीन स्थितीत रुग्णालयात आलेल्या रुग्णाला पैशासाठी उपचार नाकारता येत नाहीत. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडून या नियमाचे उल्लंघन झाले का, याची तपासणी समितीने शनिवारी केली. गर्भवती रुग्णालयात गेली त्या वेळी ती आपत्कालीन स्थितीत होती का, याची तपासणी समितीने केली. यासाठी गर्भवतीच्या वैद्यकीय अहवालांच्या आधारे समितीने प्रसूती, स्त्रीरोग, हृदयविकार, फिजिशिअन या अशा विविध तज्ज्ञांशी चर्चा केली. समिती उद्या (रविवारी) रुग्णाच्या नातेवाइकांशी चर्चा करणार आहे. सर्व प्रक्रिया करून येत्या दोन दिवसांमध्ये अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नर्सिंग होम ॲक्टमधील नियमानुसार आपत्कालीन स्थितीत रुग्णालयाला रुग्णाकडे अनामत रक्कम मागता येत नाही. त्यामुळे रुग्णालयाकडून या नियमाचे उल्लंघन झाले का, याची तपासणी केली जात आहे. रुग्णालयातील डॉक्टरांनी रुग्णाच्या पतीला दूरध्वनी केला होता, असा दावा रुग्णालयाने केला आहे. त्याची खातरजमा समिती करीत असून, याप्रकरणी रुग्णालयाकडे समितीने पुरावा मागतिला आहे, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान, आरोग्य विभागाच्या माता मृत्यू समितीची बैठक शनिवारी झाली. या बैठकीत गर्भवतीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, यावर चर्चा करण्यात आली.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply