पिंपरी- चिंचवडमध्ये भरदिवसा एकावर झाडल्या गोळ्या; आरोपी फरार

पिंपरी: पिंपरी- चिंचवड शहरातील चिखली येथे अज्ञाताने एकावर गोळीबार केल्याची घटना घडली असून यात तो गंभीर जखमी झाला आहे. सोन्या तापकीर असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडल्याचे चिखली पोलिसांनी सांगितले आहे. या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील चिखली परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोघांनी सोन्या तापकीर याच्यावर गोळ्या झाडल्या आहेत. यात तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोळीबाराचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. भरदिवसा घडलेल्या घटनेमुळे पिंपरी- चिंचवड शहरात पुन्हा एकदा खळबळ माजली आहे.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील तळेगाव दाभाडे येथे १२ मे रोजी किशोर आवारे यांची भरदिवसा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली गेली होती. आता पुन्हा भरदिवसा गोळीबाराची घटना घडल्याने पिंपरी-चिंचवड शहरात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत. याप्रकरणी अज्ञात आरोपीचा शोध चिखली पोलीस घेत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply