Pune News : मित्रासोबत पोहायला गेला, पाण्याचा अंदाज आला नाही, १४ वर्षाच्या मुलाचा ३ दिवसांनी मृतदेह सापडला

Pune News : एका शालेय विद्यार्थ्याचा कालव्यात पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. तीन दिवसानंतर त्याचा मृतदेह पोलिसांना सापडला आहे. हा मुलगा सातवीत शिकत होता. कालव्यात पोहायला गेल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्यामुळे त्याचा बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना पुण्यात घडली आहे. या घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

समर्थ अमोल यादव (वय वर्ष १४) असे मृत मुलाचे नाव आहे. त्याच्या पश्चात आई-वडील आणि भाऊ असा परिवार आहे. तो शनिवारी सातववाडी येथील ग्रामदैवत बापुजी बुवा मंदिरालगत कालव्यामध्ये पोहायला गेला होता. पाण्यात पोहण्यासाठी कालव्यात उतरला. वाहत्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो पाण्यात बुडाला.


काही वेळानंतर मित्रांना समर्थ दिसला नाही. त्यांनी आरडाओरड केली. त्यानंतर मित्रांनी याची माहिती गावात जाऊन दिली. गावातील लोकांनी तातडीने अग्निशमन दलाला बोलावण्यात आले. मात्र, तो काही सापडाल नाही. तब्ब्ल तीन दिवसानंतर मुलाचा मृतदेह सापडला. या घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त करण्यात येत आहे.

Ahilyanagar Crime : स्विमिंग पुलाच्या चेंजिंग रूममधून आरटीओ अधिकाऱ्याची सोनसाखळी चोरी; चार तासातच पोलिसांकडून पर्दाफाश


खाणीत बुडून मृत्यू

पुण्यातील विमाननगर येथे राहणाऱ्या अकरावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा खाणीत पोहताना बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्देवी घटना शनिवारी घडली. त्याच्यासोबत आणखी मुलगा खाणीत पोहत होता. त्याला वाचवण्यात यश आले आहे. मात्र, संजय बोदक (वय वर्ष १६) असे मृत मुलाचे नाव असून, या घटनेनंतर परिसरातून शोक व्यक्त केला जात आहे.

 
 
 
 
 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply