
Pimpri : आकुर्डी येथील डी वाय पाटील महाविद्यालय परिसरात आरडीएक्स विस्फोटक पेरले असून परिसरात मोठा स्फोट घडवून आणला जाणार असल्याचा ई-मेल महाविद्यालय प्रशासनाला प्राप्त झाला. त्यानंतर पिंपरी-चिंचवड पोलिसांची आणि महाविद्यालय प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली. पोलिसांनी संपूर्ण परिसरात शोधमोहीम राबविली. खोडसाळपणे हा मेल केला असल्याची शक्यता आहे.
आकुर्डी येथे डॉ. डी वाय पाटील संस्थेचे मोठे कॅम्पस आहे. या कॅम्पस मध्ये हजारो विद्यार्थी वेगवेगळ्या शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. मंगळवारी (११ मार्च) महाविद्यालयामध्ये परीक्षा सुरु असताना अचानक प्रशासनाला सकाळी नऊ वाजता एक मेल प्राप्त झाला. त्यामध्ये महाविद्यालय परिसरात आरडीएक्स नावाचे विस्फोटक पेरले असून त्याद्वारे महाविद्यालय उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती.
|
Pune : जगद्गुरु संत तुकाराम महाराज बीजनिमित्त देहूतील मंदिरात सर्वांत मोठ्या पगडीचे लोकार्पण |
महाविद्यालय प्रशासनाने दुपारी बारा वाजता पिंपरी-चिंचवड पोलिसांना मेलबाबत माहिती दिली. माहिती मिळताच रावेत पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अचानक पोलिसांचा मोठा ताफा महाविद्यालयात पोहोचल्याने विद्यार्थी आणि प्राध्यापकांमध्ये घबराट पसरली. पोलिसांनी तत्काळ संपूर्ण महाविद्यालय रिकामे करण्याचे आदेश दिले आणि सर्व विद्यार्थ्यांना बाहेर काढून तपासणी सुरू केली. परिसरात तपासणी सुरू असताना अफवांना उधाण आले. त्यामुळे पालकांनीही घाईघाईने महाविद्यालयाकडे धाव घेतली. दरम्यान बॉम्ब शोधक नाशक पथक, श्वान पथक, सायबर पोलीस आणि गुन्हे शाखेच्या पोलिसांना पाचारण करण्यात आले.
आयुक्तालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी सुरुवातीला परीक्षा सुरु असलेल्या ठिकाणचा परिसर पिंजून काढला. तिथे कुठेही विस्फोटक आढळले नाही. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण महाविद्यालयात शोधमोहीम राबवली. विस्फोटक नसल्याची खात्री झाल्यानंतर या मेलबाबत तांत्रिक माहिती काढण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. सायबर पोलिसांकडून मेल पाठवणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवण्याचे काम सुरु आहे.
पोलिसांनी पालक आणि विद्यार्थ्यांना घाबरून न जाण्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणात ज्या ई-मेल अकाऊंटवरून धमकी पाठवण्यात आली आहे, त्या अज्ञात व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर क्राइम सेलकडून तपास सुरू आहे. अशा खोट्या ई-मेल पाठवणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
शहर
- Pune : पुण्यात शिवजयंतीनिमित्त वाहतुकीत मोठे बदल; शहराच्या मध्यवर्ती भागात मिरवणुका, अनेक रस्ते बंद
- Baramati : ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवून व्हिडिओ कॉलवर वयोवृद्ध महिलेची 45 लाखांची लूट
- Pune : पुण्यात पुन्हा GBSचं संकट; 51 वर्षीय रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू, आरोग्य यंत्रणा अलर्ट
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
महाराष्ट्र
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
- एन. रघुरामन यांचा कॉलम:हातोडा कुठे, कसा आणि कधी मारायचा हेही समजले पाहिजे!
गुन्हा
- नीरजा चौधरी यांचा कॉलम:विरोधी पक्षांनी ‘इंडिया’ पलीकडे पर्याय शोधायला हवेत का?
- शीला भट्ट यांचा कॉलम:देशाच्या नागरिकांचे हित आपल्यासाठी सर्वोच्च असावे
- पं. विजयशंकर मेहता यांचा कॉलम:आपल्या मार्गाने नीट चालावे, दुसऱ्याचा रस्ता का अडवावा?
- एन. रघुरामन यांचा कॉलम:पुरुषांमध्ये पांढरे शर्ट, महिलांत पॉकेट ड्रेस होतायत लोकप्रिय
राजकीय
- ZP Elections : १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांसाठी आज मतदान; पुणे, सातारा, कोल्हापूरसह कुठे-कुठे होणार मतदान?
- Pune : पुण्यात शरद पवारांच्या आमदाराचं ‘सर्वपक्षीय’ प्रेम चर्चेत! मुलगा-सुनेनंतर आता मुलीही वेगवेगळ्या पक्षांतून ZP च्या रिंगणात
- ZP Election : महापालिका पराभवानंतर पवारांचा मोठा डाव; जिल्हा परिषद निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला
- PMC Election Results 2026 : खडकवासल्यात ‘कांटे की टक्कर’! भाजप–राष्ट्रवादीत जागांची बरोबरी; कुठे जल्लोष, तर कुठे अश्रू
इतर
- जळगावच्या केळी उत्पादकांवर अमेरिका-इराण तणावाचा परिणाम; निर्यात ठप्प झाल्याने शेतकरी चिंतेत
- अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी विलिनीकरण चर्चांना जयंत पाटील यांचा पूर्णविराम.
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
देश विदेश
- विधानसभेत ठाकरे गट आणि भाजप आमदारांचा जोरदार राडा; सचिन शेट्टी-भास्कर जाधव भिडले.
- लग्नसराईत साडीवर ५ मिनिटांत करा ट्रेंडी आणि आकर्षक बन हेअरस्टाईल्स
- महिला दिनानिमित्त खास: कॉटन साड्यांच्या ५ ट्रेंडी डिझाईन्स, तुमच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवेत.
- प्रसिद्ध अभिनेत्री राजश्री देशपांडे ब्रेस्ट कॅन्सरशी झुंज; शस्त्रक्रियेनंतर दिली तब्येतीची माहिती

























Subscribe to my channel

