Pune News : व्हिडिओ काढून महिलांना ब्लॅकमेल करायचा, मोबाईल शोधण्यासाठी पोलीस दत्ता गाडेच्या गावात

Pune News : स्वारगेट बलात्कार प्रकरणात अटकेत असलेला दत्ता गाडे स्वारगेट पोलिसांच्या ताब्यात आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक शैलेश संखे यांच्याकडे याप्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. आता पोलीस आरोपीचा मोबाईल शोधण्यासाठी गुनाट गावी जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आरोपी दत्ता गाडेला अटक झाल्यानंतर त्याच्या संदर्भात अनेक बाबी समोर आल्या आहेत. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून, तो स्त्रीलंपट असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानं या आधीही अनेक महिलांना आपल्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केला. स्वारगेट बस डेपोमध्ये जात येणाऱ्या जाणाऱ्या महिलांवर त्याचा डोळा असायचा.

Ulhasnagar News: वैद्यकीय साहित्यअभावी रखडल्या शस्त्रक्रिया, सरकारी रुग्णालयात रूग्णांचा प्रश्न ऐरणीवर

दत्ता गाडे महिलांचे नंबर मिळवून आमिष दाखवायचा. मोबाईलमधून महिलांना संपर्क साधण्याचा प्रयत्न करायचा. तसेच लॉजबाहेर व्हिडिओ शुट करून महिलांना ब्लॅकमेल करायचा. त्यामुळे दत्ता गाडेच्या मोबाईलमध्ये आणखी पुरावे सापडण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

आरोपी दत्ता गाडेनं त्याचा मोबाईल गुनाट गावातील उसाच्या शेतात लपवून ठेवलं असल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरिक्षक आणि त्यांचे पथक गुनाट गावात जाऊन आरोपी ज्या ठिकाणी लपला होता, त्या उसाच्या शेतात जाऊन आरोपीचा मोबाईल जप्त करून त्याची तपासणी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply