Pune News : गोध्रा हत्याकांडातील आरोपीचे पुणे, नाशिक कनेक्शन, परोलवर बाहेर येत केले १६ गंभीर गुन्हे

Pune : गोध्रा हत्याकांड प्रकरणातील ११ व्या मुख्य आरोपीला आळेफाटा पोलिसांनी अटक केली होती. मागच्या पाच महिन्यापूर्वी सात दिवसांच्या संचित रजेवर बाहेर आल्यानंतर हा आरोपी फरार झाला होता. या आरोपीवर लुटमारीचे गुन्हे दाखल आहेत. पुणे, नाशिक जिल्ह्यात १६ गुन्हे उघड झाले आहेत. या आरोपीकडून १४ लाख ५० हजारांचा ऐवज पुणे ग्रामीण पोलिसांनी जप्त केला

ग्रोधा हत्याकांडात जन्मठेप झालेल्या आरोपीने कारागृहातून संचित रजा म्हणजे पॅरोल मिळवून पुणे आणि नाशिक जिल्ह्यात साथीदारांच्या मदतीने वाहनचालकांना अडवून लुटमारीचे गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आळेफाटा पोलिसांनी गोध्रा हत्याकांडातील आरोपीसह त्याच्याबरोबर असलेल्या साथीदारांना देखील अटक केली. या टोळीने आळेफाटा, मंचर, नाशिक जिल्ह्यातील सिन्नर परिसरात गुन्हे केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यांच्याकडून १४ लाख ४१ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.

याप्रकरणी सलीम उर्फ सलमान युसूफ जर्दा (वय ५५ वर्षे), साहिल हनीफ पठाण (वय २१ वर्षे), सुफीयान सिकंदर चँदकी (वय २३ वर्षे) आयुब इसाग सुनठीया (वय २९ वर्षे), इरफान अब्दुलहामीद दुरवेश (वय ४१ वर्षे) यांना अटक करण्यात आली. हे सर्व आरोपी गुजरातच्या गोध्रा येथे राहतात. आरोपी सलीम जर्दा हा गोध्रा हत्याकांडातील मुख्य आरोपी असून त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती.

कारागृहातून तो संचित रजा मिळवून तो बाहेर पडला. त्यानंतर तो कारागृहात परतला नाही. फरार झाल्यानंतर आरोपी सलीम जर्दाने साथीदारांशी संगनमत करुन घरफोडीचे गुन्हे करण्यास सुरुवात केली. आळे फाटा परिसरात या टोळीने एका टेम्पोचालकाला लुटले होते. टेम्पोतील टायर ट्यूब चोरून आरोपी पसार झाले होते. या टोळीविरुद्ध विविध पोलिस ठाण्यात तब्बल १६ गुन्हे दाखल आहेत. वाहनचालकांना अडवून लूटमार करत होते. आळेफाटा पोलिसांनी तपास करत या आरोपींना अटक केली. अधिक तपास ग्रामीण पोलिस करत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply