Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! यंदाही मिळकतकरात वाढ नाही; ९ वर्षांपासून एकच दर

Pune : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. पुणेकरांना यंदा महापालिकेकडून दिलासा मिळाा आहे. यंदा मिळकतकरात कोणतीही वाढ होणार नाहीये. त्यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळाला आहे. मिळकतकर स्थिर असेल तर सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला कात्री बसणार नाही. 

यंद मिळकतकरामध्ये कोणत्याही स्वरुपाची वाढ न करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सादर करण्यात आला होता. वाढत्या महागाईमुळे आधीच सर्वसामान्य नागरिक चिंतेत आहे. त्यात मिळकतकरात वाढ केली असती तर सर्वसामान्यांना चांगलाच फटका बसला असता.त्यामुळेच पुणेकरांना महापालिकेकडून चालू आर्थिक वर्षात मिळकतकरात कोणत्याही स्वरुपाची वाढ केली जाणार नसल्याने चांगलाच दिलासा मिळणार आहे.

Pune : पुणेकरांना काहिसा दिलासा! २४ तासांत जीबी सिंड्रोमचा एकही रुग्ण नाही, रुग्णसंख्या १३० वर स्थिर

२०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी मिळकतकरात कोणतीही वाढ होणार नसल्याचे सांगितले आहे. पुणे महापालिका प्रशासनाकडून मागील ९ वर्षात मिळकतकरात कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही. दरम्यान,२०२५-२६ या आर्थिक वर्षाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे काम महापालिका प्रशासनाकडुन सुरु आहे. त्यामुळे २० फेब्रुवारीपुर्वी करवाढीबाबतचा निर्णय घेणे महापालिका प्रशासनास बंधनकारक आहे.मात्र मागील तीन वर्षांपासुन महापालिकेत प्रशासकराज आहे, महापालिकेची सर्वसाधारण सभा आता अस्तित्वात नाही.

पुणे महापालिकेने 2010-11 मध्ये मिळकत करामध्ये 16 टक्के, 2013-14 मध्ये 6 टक्के तर 2015-16 या आर्थिक वर्षाच्या अंदाजपत्रकात मिळकत करामध्ये 10 टक्के करवाढ केली होती. तेव्हापासुन आत्तापर्यंत करवाढ झालेली नाही.तेव्हापासुन आत्तापर्यंत करवाढ झालेली नाही.यंदाही मिळकतकरात वाढ न झाल्याने सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply