Pune News : रिंग रोडसाठी ९० टक्के भूसंपादन, भूमिपूजनाचा मार्ग मोकळा, ३ दिवसांत शिक्कामोर्तब होणार

Pune Ring Road Project Update News : पुण्यातील बहुचर्चित रिंग रोडचे काम लवकर सुरू होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दोन-तीन दिवसात पुण्यातील रिंग रोड संदर्भात बैठक होणार आहे. पुणे शहरा भोवती साकारण्यात येणाऱ्या रिंग रोडसाठी पश्चिम भागात 96% जमीन संपादित झाली आहे. त्यामुळे लवकरच एका बाजूने काम सुरू करण्यात येईल.

पुण्यातील रिंग रोडसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची लवकरच आढावा बैठक होणार आहे. त्याबैठकीनंतर रिंग रोडचं भूमिपूजन कधी होणार? हे निश्चित होणार आहे. त्यामुळे रिंग रोडचे लवकरच भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष काम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत मंगळवारी नवनियुक्त जिल्हाधिकारी जितेंद्र ड्युटी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

Torres Jewelers : टोरेस कंपनीचा भंडाफोड कसा झाला, कुठपर्यंत पसरलंय जाळं? गुन्हा नोंद होताच महत्वाची माहिती आली समोर

पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराभोवती 169 किलोमीटर लांबीचा आणि 110 मीटर रुंदीचा, रिंग रोड महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने साकारण्यात येत आहेत. रिंग रोडसाठी आवश्यक 90% पेक्षा जास्त प्रमाणात पश्चिम भागात जमीन संपादित झाला आहे. नवीन सरकार आलं, खाते वाटप झाले, मात्र रिंग रोड भूमिपूजनाचा मुहूर्त लागत नसल्याने रिंग रोडचा प्रकल्प प्रकल्पाची चर्चा सुरू झाली आहे, त्यावर टीका टिपणी होते.

पुण्यासाठी महत्त्वाचा असणारा रिंग रोडमुळे वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. त्यासाठी पूर्व भागात 82 टक्के भूसंपादन झाले असून 18% संपादन बाकी आहे. पश्चिम भागाच्या 9% भूसंपादन झाल्याने चार टक्के संपादन बाकी आहे, त्याची काम सुरू आहेत. येणाऱ्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री यावर निर्णय घेतील आणि भूमिपूजन कधी करायचे, हे निश्चित करतील. याबाबतच्या अधिकाऱ्यांच्या बैठकाही झाल्या आहेत.

 

 

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply