Pune : दोन किलोमीटर रस्त्यासाठी अर्धा तास, बिबवेवाडीतील वाहतूक कोंडीने नागरिक त्रस्त

बिबवेवाडी - सातारा रस्त्यावरील माणिक दुगड चौकातून सुरु होणार्‍या स्वामी विवेकानंद मार्गासह अंतर्गत रस्त्यावरील चार ठिकाणच्या कामांमुळे बिबवेवाडीकर पुरते वाहतूक कोंडीत अडकलेले असून दोन किलोमीटर अंतरात चार ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे, रस्त्यांच्या कामाकडे ना महापालिका प्रशासनाचे लक्ष ना वाहतूक पोलिसांचे लक्ष,

नागरिक, कार्यकर्ते स्व:ता वाहतूक कोंडी सोडवत असतात त्यामुळे रस्त्याला वाली कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे. विवेकानंद मार्गाच्या सुरवातीला प्रेम नगर येथील माणिक दुगड चौकात भुयारी मार्गा शेजारून विवेकानंद मार्गाला जोडणाऱ्या जुन्या रस्त्याचे सीमेंट काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू आहे संथ गतीने मुदतीपेक्षा जास्त काळ काम सुरू आहे त्यामुळे चौकात वाहतूक कोंडी होते.

विवेकानंद मार्गावरील गावठाण चौकात भगली हॉस्पिटल चौका कडे जाणार्‍या रस्त्याचे 130 मीटर सीमेंट काँक्रीटकरण करण्याचे काम सुरू आहे, रस्त्याचे अर्धवट काम केले असून येथे वाहने पार्किंग केली जातात त्यामुळे वाहतूक कोंडी होते, रस्त्यावर शाळा आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून शाळेत जावे लागते.

बिबवेवाडी पोलीस ठाण्यापासून संविधान चौकापर्यंत 80 मीटर चा रस्ता सीमेंट काँक्रीट चा करण्याचे काम खूपच संथगतीने सुरू आहे. रस्त्याच्या दुतर्फा अर्धवट कामे झालेली असून त्यातच नव्याने संविधान चौक ते अप्पर बस थांब्यापर्यंत चैत्रबन झोपडपट्टी च्या बाजूने 90 मीटर रस्त्याची एक बाजू सीमेंट काँक्रीटकरणासाठी खोदलेली आहे.

त्यामुळे प्रचंड प्रमाणात दररोज वाहतूक कोंडी चा सामना नागरिकांना करावा लागतो. लेक टाऊन सोसायटी, अप्पर, महालक्ष्मी नगर, सुखसागर नगर, व्हीआयटी हॉस्टेलकडे जाणाऱ्या काही मीटर च्या रस्त्यासाठी अर्धा अर्धा तास वाहतूक कोंडीत वाहने अडकतात.आबा बाबर ( स्थानिक रहिवासी ) : चिंतामणी नगर येथील रस्त्यांचे काम अर्धवट असताना चैत्रबन समोर रस्त्याचे काम सुरू केले आहे.

त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडली असून अधिकारी दुर्लक्ष करतात, कामाची गती पाहता पावसाळ्या पूर्वी काम पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे.अमर शिंदे ( कार्यकारी अभियंता पथ विभाग ) : पावसाळी व सांडपाणी वाहिन्यांच्या कामामुळे रस्त्याच्या कामाला विलंब झाला, खोदलेले रस्ते पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणार आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply