Pune : ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’, पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात लागले फ्लेक्स

Pune : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक राजकीय पक्षाकडून बैठका, मेळावे आणि रॅलीच आयोजन करून मतदारापर्यंत पोहोचण्याच प्रयत्न करीत आहे. या सर्व घडामोडीदरम्यान पुण्यातील पर्वती विधानसभा मतदारसंघात ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ पर्वती विधानसभा मतदारसंघ या आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स लागले आहेत.

या पर्वती विधानसभा मतदारसंघातून भाजपने विद्यमान आमदार माधुरी मिसाळ यांना पुन्हा उमेदवारी दिली. तर महाविकास आघाडीमध्ये पर्वती विधानसभा मतदारसंघ शरद पवार गट की काँग्रेस पक्षाच्या वाट्याला ही जागा जाणार अशी चर्चा बराच काळ चालली. या मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नगरसेवक आबा बागूल आणि शरद पवार गटाच्या माजी नगरसेविका अश्विनी कदम हे दोघेजण अनेक महिन्यांपासून विधानसभेची तयारी करीत आले आहेत. त्यामुळे या दोघांनी पक्षश्रेष्ठीना आपल्याच पक्षाच्या वाट्याला ही जागा सोडली जावी अशी मागणी केल्याचे दिसून आले. या जागेवरून बराच काळ चर्चा झाल्यावर अखेर ही जागा शरद पवार गटाला सोडण्यात आली आणि या जागेवरून माजी स्थायी समिती अध्यक्षा अश्विनी कदम यांना उमेदवारी देण्यात आली. या मतदारसंघातून ३० वर्षांहून अधिक काळ नगरसेवक म्हणून आबा बागुल हे निवडून आले आहे. आबा बागूल यांनी २००९ पासून काँग्रेस श्रेष्ठीकडे पक्षाकडे उमेदवारी मिळावी, यासाठी मागणी करित आले. पण प्रत्येक वेळी आबा बागुल यांना डावलण्यात आले. तर यंदा हा मतदारसंघ शरद पवार गटाला गेला. त्यामुळे आबा बागूल हे नाराज झाले. त्यावर त्यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्याचा निर्णय घेतला. या मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला.

Navi Mumbai Accident : दिवाळीत 'ड्रंक अँड ड्राइव्ह, नवी मुंबईत मद्यपी चालकाने ३ जणांना उडवले, व्हिडीओ व्हायरल

यामुळे पर्वती विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार माधुरी मिसाळ, शरद पवार गटाच्या अश्विनी कदम आणि काँग्रेस पक्षाचे बंडखोर उमेदवार आबा बागूल यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत ४ तारखेपर्यंत आहे. त्यामुळे सध्या तरी तिरंगी लढत म्हणावी लागेल, काँग्रेस पक्षाचे नेतेमंडळी आबा बागूल यांची नाराजी दूर करण्यात यशस्वी होतात का हे पहावे लागणार आहे. या सर्व घडामोडीदरम्यान पर्वती विधानसभा मतदारसंघात ‘यंदा पर्वतीत सांगली पॅटर्न’ पर्वती विधानसभा मतदारसंघ या आशयाचे मजकूर असलेले फ्लेक्स लागले आहे. या फ्लेक्सबाजीमुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply