Pune : ससून रुग्णालयात सर्वात मोठा घोटाळा; कर्मचाऱ्यांनी हडपले कोट्यवधी रुपये, २३ जणांविरोधात गुन्हा

Pune : पुणे येथील ससून रुग्णालय नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे सतत वादाच्या भोवऱ्यात सापडत आहे. काही महिन्यांपूर्वी ललित पाटील ड्रग्ज प्रकरणामुळे या रुग्णालयाची संपूर्ण महाराष्ट्रभरात चर्चा झाली होती. त्यानंतर पोर्शे कार अपघात प्रकरणातही रुग्णालयात गैरप्रकार झाल्याचं समोर आलं. आता थेट ससून रुग्णालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोट्यवधी रुपये हडपल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

अधिकाराचा गैरफायदा घेत ससूनमधील कर्मचाऱ्यांनी चक्क रुग्णालयाच्या ४ कोटी १८ लाख रुपयांवर डल्ला मारला आहे. हा गैरप्रकार लक्षात येताच ससुनचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यांच्या तक्रारीवरून बंड गार्डन पोलिसांनी रुग्णालयातील १६ कर्मचारी आणि ७ खाजगी व्यक्ती अशा एकूण २३ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Maharashtra Government GR : स्वातंत्र्य सैनिकांच्या पाल्यांच्या नोकरीवर गदा; राज्य सरकारने घेतला सर्वात मोठा निर्णय

अनिल माने आणि सुलक्षणा चाबुकस्वार अशी गुन्हा दाखल झालेल्या मुख्य आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक गैरव्यवहाराचा हा प्रकार ३१ जुलै २०२३ ते २४ जानेवारी २०२४ या कालावधीत घडला आहे. अनिल माने हा ससून रुग्णालयात अकाऊटंट असून चाबुकस्वार रोखपाल म्हणून काम करते.

काही दिवसांपूर्वी रुग्णालयाच्या शासकीय नोंदवहीत आर्थिक तफावत असल्याची बाब समोर आली होती. याबाबत वैद्यकीय संचालनालयाच्या स्तरावर चौकशी समिती नेमण्यात आली. या चौकशीमध्ये तब्बल ४ कोटी १८ लाख रुपयां आर्थिक गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले. त्यामुळे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी गोरोबा आवटे यांनी या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात तक्रार दिली.

त्यांच्या तक्रारीनंतर तात्काळ बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हा संपूर्ण प्रकार उघडकीस येताच प्रशासनाने अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक गैरव्यवहारामध्ये लेखपाल माने यांच्यासह रुग्णालयातील वरिष्ठ लिपिक, लिपिक, परिचारिका, तंत्रज्ञ यांच्यासह काही खासगी व्यक्तींचा सहभाग आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply