Pune : IT कंपनीच्या संचालकालाच्या कुटुंबावरच सोसायटीनं टाकला सामाजिक बहिष्कार, पुण्यातील धक्कादायक प्रकार

Pune : आयटी कंपनीच्या संचालकालाच्या कुटुंबावर सोसायटीने सामाजिक बहिष्कार टाकल्याची धक्कादायक घटना पुण्यामध्ये घडली आहे. पुरोगामी पुण्यामध्ये ही घटना घडल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महाराष्ट्राला हादरवून टाकणारी ही घटना पुण्यातल्या चतुश्रृंगी परिसरात घडली आहे. याप्रकरणी १३ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुरोगामी पुणे शहरांमध्ये आयटीतील संचालकासोबत धक्कादायक प्रकार घडला आहे. जगप्रसिद्ध आयटी कंपनीच्या संचालकालाच सोसायटीने सामाजिक बहिष्कृत केले आहे. पीडिताच्या घरासमोर लावलेले दिवे नारळ टाकून विजवले. गणपतीच्या समोर अथर्वशीर्ष पटण करण्यासाठी गेलेल्या फिर्यादीच्या पत्नीला देखील मज्जाव करण्यात आला. फिर्यादीच्या अल्पवयीन मुलींसोबत सोसायटीतील मुलांना खेळण्यासाठी बहिष्कृत केले.

Pune : घोरपडे पेठेतील गुंड जंगल्या सातपुतेचा खुनाचा कट उधळला, एन्जॉय ग्रुपच्या सातजणांना अटक; सात पिस्तुलांसह २३ काडतुसे जप्त

पुण्यातील चतुश्रृंगी परिसरात असलेल्या नागरस रोडवरील सुप्रिया टॉवर्समधील हा धक्कादायक प्रकार आहे. सामाजिक बहिष्कृत केल्याप्रकरणात सोसायटीच्या १३ जणांवर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रुपेश जुनवणे, दत्तात्रय साळुंखे, अश्विनी पंडित, सुनील पवार, जगन्नाथ मुरली, अश्विन लोकरे, अनिरुद्ध काळे, समीर मेहता, संजय गोरे, सोनाली साळुंखे, शिल्पा जुनवणे, अशोक खरात आणि वैजनाथ संत यांच्यावर चतुश्रृंगी पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपींनी आयटी कंपनीतील संचालकाच्या कुटुंबाला बहिष्कृत केले होते. या कुटुंबातील सदस्याला सोसायटीतील या सभासदांनी त्यांच्याशी न बोलणे, लिफ्टमध्ये गेल्यानंतर तोंड वाकडे करणे, क्रूर चेष्टा करणे, त्यांच्या घरावर नारळ फेकणे अशा पद्धतीचे अमानवी कृत्य करत होते. या सगळ्याला कंटाळून पीडित कुटुंबाने कोर्टात दाद मागितली होती. याची दखल कोर्टाने घेऊन १३ जणांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले आहेत. सोसायटीचा हिशोब मागितल्यामुळे या कुटुंबीयांवर बहिष्कार टाकण्यात आल्याचे कारण समोर आले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply