Pune News : शासन मान्यता न घेताच भरवली शाळा, पुण्यातील धक्कादायक प्रकार; अध्यक्ष, संचालकांवर गुन्हा

 

Pune : पुणे शहरातील उंड्री येथील ईरा एज्युकेशन सोसायटीतर्फे संचालित ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलकडे कोणतीही शासनाची परवानगी नसताना इयत्ता पहिली ते दहावीचे अनधिकृत वर्ग चालविले जात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी शाळेविरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुण्यातील उंड्री येथील ईरा एज्युकेशन सोसायटीतर्फे संचालित ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलकडे कोणतीही शासनाची परवानगी नसताना इयत्ता पहिली ते दहावीचे अनधिकृत वर्ग चालविले जात असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी जिल्हा परिषदेने धडक कारवाई केली असून या स्कूलच्या विरोधात कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ravikant Tupkar News : ब्रेकिंग! रविकांत तुपकर यांची 'स्वाभिमानी शेतकरी संघटने'तून हकालपट्टी; शिस्तभंग समितीची कारवाई

अनधिकृत वर्ग चालविले जाण्याप्रकरणी पिंपरी-चिंचवडनंतर पुणे शहरात गुन्हा दाखल झाल्याची ही दुसरी घटना आहे. जिल्हा परिषदेचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी ज्ञानदेव आबाजी खोसे, यांनी ऑर्किड्स इंटरनॅशनल स्कूलच्या आणि संस्थेचे अध्यक्ष जे विकोस्टा (रा. बेंगलोर), संचालक समीर गोरडे (रा. विमाननगर ) यांच्याविरुध्द अनधिकृत शाळा चालविल्याने गुन्हा दाखल करावा अशी फिर्याद दिली आहे.

विद्यार्थ्यांचे दाखले देणे, विद्यार्थ्यांचे मूळ जन्मप्रमाणपत्र अनधिकृतरित्या ताब्यात घेणे, अनधिकृतरित्या जनरल रजिस्टर क्रमांक एकमध्ये नाव नोंदणी करणे, विद्यार्थी उपस्थितीपत्रक बनविणे, शाळेला शासनमान्यता नसताना असल्याचे भासवण्याचे प्रकार या शाळेने केले आहेत. ही शाळा अनधिकृतरित्या सुरू असल्याने शासनास आवश्यक असलेला महसूल बुडून शासनाची फसवणूक केली आहे, असे जिल्हा परिषदेचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply