Pune : शिष्यवृत्ती परीक्षेत तब्बल २१४ शाळांचा शून्य टक्के निकाल; शिक्षण विभागाचा संताप; शिक्षकांची वेतनवाढच रोखली!

Pune : राज्यात नुकत्याच झालेल्या पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत पुणे जिल्हा परिषदेच्या २१४ शाळांचा निकाल शून्य टक्के लागला आहे. या निकालाची शिक्षण विभागाने गंभीर दखल घेतल्याचं समोर आलंय. याप्रकरणी आता २१४ शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहे. तसेच समाधानकारक खुलासा न मिळाल्यास संबंधितांची एक वेतन वाढ रोखण्याचा निर्णय घेण्याचा इशारा देण्यात आलाय.

याप्रकरणी शिक्षण विभागाचा संताप आता पाहायला मिळतोय. संबंधितांवर कारवाई करण्याची भूमिका शिक्षण विभागाने घेतली आहे. शिक्षकांची वेतनवाढ आता याप्रकरणी रोखली जाण्याची शक्यता वर्तवली जातेय.

CM Eknath Shinde : ‘मुख्यमंत्री लाडकी बहिण’ योजनेनंतर आता लाडक्या भावांसाठीही योजना, 12 वी पास तरुणांना मिळणार ‘इतकी’ रक्कम

इयत्ता पाचवीची वर्गाच्या मुला मुलींसाठी शिष्यवृत्तीची परीक्षा घेण्यात येते.त्या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची तयारी घेणे, त्यांना परीक्षेसाठी तयार करणे आणि त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रवृत्त करण्याची जबाबदारी ही शिक्षकांची आहे.पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६२१ इतक्या शाळा आहेत. त्यापैकी पाचवी इयत्तेच्या ९३२ शाळा आहेत. त्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत सहभागी होणे गरजेचे होते.

२१४ शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शून्य टक्के

तब्बल २१४ शाळांचा शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल शून्य टक्के लागला आहे. त्यामुळे शिक्षण विभाग आता अॅक्शन मोडमध्ये आलंय. या शाळांमध्ये एकही विद्यार्थी शिष्यवृत्ती परीक्षा उत्तीर्ण झाले नाहीत. त्यामुळे शिक्षण विभागाने २१४ शाळेतील संबंधित शिक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे, तर जिल्ह्यातील १०९ शाळांनी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज भरले नसल्याचं समोर आलंय. त्यामुळे संबंधित शाळांच्या शिक्षकांनाही नोटीस बजावण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply