Pune : आषाढीवारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. या पार्श्वभूमीवर संस्थानने जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या दिंडीतील वारकऱ्यांना पिण्याचे स्वच्छ पाणी, आरोग्य सेवा आणि पावसापासून संरक्षण मिळावे, यासाठी संत तुकाराम महाराज संस्थानने विशेष काळजी घेतली आहे.
जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराज पालखी सोहळा येत्या २८ जूनला देहूतून पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. या पार्श्वभूमीवर संस्थानने जय्यत तयारी केली आहे. पालखी सोहळा प्रमुख विशाल महाराज मोरे म्हणाले, पालखी सोहळ्यातील चांदीचा रथ, अब्दागिरी यांना पॅालिश करण्यात आले आहे. पालखी सोहळ्यात ३६३ दिंड्यांची नोंद झाली आहे. सोहळ्यातील सर्व दिंडीप्रमुखांना संस्थानने पत्रव्यवहार केला आहे. पालखी मार्गावर भाविकांना विविध सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी पाणी, आरोग्य, वीज, रस्ते विभागाला पत्रव्यवहार केला आहे. पालखी मार्गावरील अन्नदानासाठी लागणारे साहित्य खरेदी केले आहे. टाळ, मृदंग, पखवाज, वीणा व पूजेच्या साहित्याची खरेदी करण्यात आली आहे.
Pune : पिंपरी- चिंचवडमध्ये रिल्स बनवत वाहनांची तोडफोड; दोन अल्पवयीन पोलिसांच्या ताब्यात |
मानकरी, सेवेकरी, दिंडीप्रमुखांना पत्र्यव्यवहार केला आहे. देऊळवाड्यातील स्वच्छतेसाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून सुरक्षारक्षकही तैनात करण्यात आले आहेत. विविध विभागांसाठी नियंत्रण कक्ष उभारण्यात येणार आहेत. पिण्याच्या पाण्याचे दहा टँकर उपलब्ध केले आहेत. नळाद्वारे चोवीस तास पाणीपुरवठा राहणार आहे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. देहूरोड आणि तळवडे या दोन्ही भागांतून चोवीस तास वीजपुरवठा राहणार आहे. महाद्वारातून पालखी प्रस्थानाच्या दिवशी दिंड्यांना प्रवेश देण्यात येणार असून, तपोनिधी नारायण महाराज प्रवेशद्वारातून बाहेर जाण्याचा मार्ग आहे.
श्री संत तुकाराम महाराजांच्या ३३९ व्या पालखी सोहळ्यासाठी नवी वेलवेटची छत्री बनविण्यात आली आहे. पुण्यातील भवानी पेठ येथील विठ्ठल मंदिराचे सेवेकरी राजेश भुजबळ व त्यांच्या मित्र मंडळींनी चेन्नई येथून तुकोबारायांच्या पालखीवर सावली धरण्यासाठी खास छत्री तयार करून घेतली आहे. ही छत्री भुजबळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी संस्थानकडे सुपूर्द केली. छत्रीवर शंख, चक्र, तिलक (गंध), गरूड, हनुमान यांची चित्र हातकामाने (हातमाग) केलेली आहे. इतर भागात सुरेख नक्षीकाम केलेले आहे. छत्रीसाठी लागणाऱ्या काड्या नैसर्गिक बांबूच्या चिमट्यांपासून बनविलेल्या आहेत. छत्री पकडण्यासाठी आठ फूट उंचीच्या लोखंडी भक्कम पाइपचा वापर करण्यात आला आहे. छत्रीवर पितळी कळस बसविण्यात आला आहे.
पुरेसा औषधसाठा उपलब्ध आहे. पाच ठिकाणी उपचार केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात आंतर, बाह्य रुग्ण विभाग असणार आहे. दहा रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. प्रत्येय दिंडीला प्राथमिक उपचार औषध पेटी दिली जाणार आहे. -डॉ. किशोर यादव, मुख्य वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र देहूगाव
शहर
- SSC-HSC Result : यंदा दहावी-बारावीचा निकाल लवकर लागणार, शिक्षण मंत्र्यांनी थेट तारीखच सांगितली
- Pune : महात्मा गांधी रस्ता परिसरातून १५ लाखांचे मेफेड्रोन जप्त, दोघांना अटक
- Pune : राडारोडा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष केल्यास अधिकाऱ्यांवर होणार शिस्तभंगाची कारवाई !
- Milk Tanker Accident : शिंदवणे घाटात दुधाच्या टँकरचा अपघात; चालकाचा जागीच मृत्यू, एकजण गंभीर
महाराष्ट्र
- Hydrogen Train : मुंबई किंवा दिल्ली नाही तर या ठिकाणाहून धावणार सर्वात पहिली हायड्रोजन ट्रेन
- Dhule Fraud Case : एमएसईबी अधिकारी असल्याची बतावणी करत लाखोंचा गंडा; धुळे सायबर पोलिसांनी तिघांना घेतले ताब्यात
- Ulhasnagar Crime : फेसबुकच्या मैत्रीतून साधली जवळीक; ब्लॅकमेल करून लग्न, नंतर घडले ते भयंकर
- Chinchani Village : दोनशे लोकवस्तीच्या गावात एक कोटीची उलाढाल; वर्षभरात चिंचणीला २५ हजार पर्यटक दाखल
गुन्हा
- Pune : मद्यधुंद तरुणाकडून वाहतूक पोलिसाला मारहाण; मगरपट्टा परिसरातील घटना
- Madhya Pradesh Crime : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये
- Pune Crime : पुण्यात धक्कादायक प्रकार उघड; शाळेतील मुलींचे चेंजिंग रूमध्ये कपडे बदलताना केले व्हिडिओ शूटिंग
- Mumbai : तरुणीचे केस कापले, नंतर बॅगेत भरून घेऊन गेला; दादर स्टेशनवरील धक्कादायक प्रकारानं खळबळ
राजकीय
- Maharashtra Politics : शिंदेंची शिवसेना चौकशीच्या फेऱ्यात, हेलिकॉप्टरने AB फॉर्म पाठवणं अंगलट!
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- MahaKumbh 2025 : महाकुंभातलं पहिलं अमृतस्नान; अडीच कोटी भाविकांची संगमावर डुबकी
- Mahakumbh Mela 2025 : संगमावर पहिल्याच दिवशी ४० लाख लोकांचा स्नान सोहळा, संगमात स्नानाचा उत्सव
- Maha Kumbh 2025 : महा कुंभमेळ्यासाठी रेल्वेचे खास नियोजन; रेल्वेसह यात्रेकरुंसाठी विशेष सुविधा
- Madhya Pradesh Crime : श्रद्धा वालकर हत्याकांडाची पुनरावृत्ती! विवाहित व्यक्तीकडून लिव्ह-इन पार्टनरची हत्या, ८ महिने मृतदेह फ्रिजमध्ये