Pune News : हांडेवाडीतील महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये

Pune News :  घरांमधून निघून गेलेल्या महिलेचा मृतदेह पाण्याच्या टँकरमध्ये आढळून आल्याची घटना गुरुवारी (ता. २०) सकाळी उघडकीस आली. फुरसुंगी येथील पॉवर हाउसजवळ पाणी सोडत असताना हा प्रकार समोर आला. हा खून आहे की आत्महत्या, याबाबत पोलिसांकडून तपास केला जात आहे. कौशल्या मुकेश चव्हाण (वय २५, रा. दुगडचाळ, जेएसपीएम कॉलेजजवळ, हांडेवाडी) असे मृत महिलेचे नाव आहे. कौशल्या हरवल्याची तक्रार कोंढवा पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती.

अधिक माहितीनुसार, पुरुषोत्तम नरेंद्र ससाणे (वय २७, रा. दुगडद्याळ, हांडेवाडी) यांचा पाण्याच्या टँकरचा व्यवसाय माहे. बुधवारी (ता. १९) दिवसभर पुण्याच्या विविध भागात टँकरने पाणी पोहोचविल्यानतर रात्री साडेनऊच्या सुमाराम त्यानी घराजवळ टैंकर उभा केला. त्यानंतर ते घरी गेले. गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्यांनी टैंकर बाहेर काढला त्यानंतर त्यांनी रामटेकडी येथे पाणी भरले. टैंकर घेऊन ते फुरसुंगी येथील पॉवर हाऊसजवळ असलेल्या एका घरी पाणी पोहोचविण्यासाठी गेले होते.

Mumbai Water Shortage: मुंबईकरांची चिंता वाढली; सातही धरणांमध्ये आता इतकाच पाणीसाठा; पाहा आकडेवारी

तेथील टाकीत पाणी सोडत असताना पाणी बाहेर येत नव्हते. त्यामुळे त्यांनी सुरुवातीला वॉल्व्ह तपासला. मात्र, पाणी येत नसल्याने त्यांनी पाइप काढून पाहिले असता, आतून साडी आल्याचे त्यांना दिसले. साड़ी कुठून आली, हे पाहण्यासाठी ते टँकरवर चढले असता, त्यांना पाण्यामध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला.

याबाबतची माहिती त्यांनी पोलिसाना कळवली. हडपसर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत हा मृतदेह बाहेर काढला. पंचनामा करून मृतदेह ससून रुग्णालयात पाठविण्यात आला. टँकरमध्ये महिलेचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.कौशल्या या कोणत्या कारणामुळे घरांमधून निघून गेल्या होत्या, याचा आम्ही शोध घेत आहे, तसेच हा खून आहे



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply