Pune : पुण्यात फेरीवाल्यांची मुजोरी, अतिक्रमण कारवाईदरम्यान सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण

Pune : पुण्यात अतिक्रमण हटविण्यासाठी गेलेल्या महानगरपालिकेच्या सुरक्षारक्षकाला मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काही तरुणांनी या सुरक्षारक्षकाला लाथा-बुक्यांनी बेदम मारहाण केली आहे. पुण्याच्या कोरेगाव पार्क परिसरात ही घटना घडली. या घटनेमुळे घटनास्थळावर गोंधळाचे वातावरण आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरामध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरु आहे. या कारवाईदरम्यान पुणे महापालिका अतिक्रमण विभागाच्या सुरक्षारक्षकाला मारहाण झाली आहे. कोरेगाव पार्क येथील ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय परिसरात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. रस्त्यावरील अनधिकृत फेरीवाले यांच्याविरुद्ध कारवाई सुरू असताना सुरक्षारक्षकाला ही मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

Follow us -

पुण्यातील क्षेत्रीय कार्यालयाच्या अंतर्गत अतिक्रमण विभागने आज सकाळपासून कारवाईला सुरुवात केली आहे. पुण्यामध्ये अतिक्रमण विरोधी कारवाई सुरु असताना पालिकेच्या सुरक्षारक्षकावर काही तरुणांनी हल्ला केला.

फेरीवाल्यांनी एकत्र येत पालिकेच्या सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली. अनाधिकृत फेरीवाल्यांविरोधात कारवाई केली जात असताना त्यांनी सुरक्षा कर्मचाऱ्यावर हात उचलला. ही घटना अनेकांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली आहे. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply