Pune News : 71 म्हैशींचे प्राण वाचवून पाच ट्रकसह 60 लाखांचा मुद्देमाल जप्त; बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची मोठी कारवाई

Pune News : बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर ओतूर पोलिसांची ही मोठी कारवाई असून या मोहम्मद वकील इकरार खान (वय ६४ रा. अमरपूर, ता. सियाना, जि. बुलंदशहर उत्तरप्रदेश), तोहित वाहिद कुरेशी (वय ४५. रा. शिवाजीनगर मुंबई), उस्मानखान रमजानखान (वय ६०, रा. गोवंडी, मुंबई), रशीद अब्दुल रहीम शेख (वय ३२, रा. गावडी, मुंबई), फिरोज सोहराब मलिक (वय ४३, रा. ब्रहानाभुगरासी, ता. सियाना, जि. बुलंदशहर), फारूक कुरेशी (रा. फलटण सातारा) व मोहम्मद बिलाल भाईमिया शेख (रा. शिवाजीनगर कुर्ला मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे. तर, पाच ट्रकसह ७१ जीवंत व दोन मृत म्हैस ताब्यात घेण्यात आल्या आहेत

याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की बकरी ईद सणाच्या अनुषंगाने पुणे ग्रामीण जिल्ह्यात जनावराची अवैध वाहतूक व अवैध कत्तल रोखण्याबाबत मोहिम सुरू असून ओतुर पोलीस स्टेशन हद्दित खुबी,ता जुन्नर येथे नाकाबंदी नेमण्यात आली होती. नाकाबंदी वाहन तपासणी दरम्यान एकूण ५ ट्रकच्या पाठीमागील हौद्यामध्ये लहान-मोठे असे एकूण ७३ म्हैस जनावरे त्यांना वेदना होईल, अशा परिस्थितीत दाटीवाटीने चारा पाण्याची व्यवस्था न करता, रस्सीच्या साह्याने कुरतेने जखडून बांधून जनावरांच्या वाहतुकीचा परवाना नसताना वैद्यकीय अधिकाऱ्यांचे स्वास्थ्य प्रमाणपत्र नसताना, तसेच जनावरांना इयर टॅगिंग केले नसताना बकरी ईदचे अनुषंगाने मुंबई येथे कत्तलीसाठी विकण्यासाठी वाहतूक करून घेऊन जात असताना मिळून आले.

Student Bus Pass : विद्यार्थ्यांना शाळेतच मिळणार एसटीचे पास; राज्य परिवहन महामंडळ उद्यापासून विशेष मोहीम राबविणार

त्यापैकी ७१ म्हशी जिवंत व २ म्हैस जनावरे ट्रकमध्ये मयत अवस्थेत मिळून आले. ७१ जिवत म्हैशींना वारा-पाणी याच्या देखभालीसाठी जिवदया मंडळ गोशाळा संगमनेर, जि. अहमदनगर येथे जमा करण्यात आले आहे. सदर कारवाईमध्ये एकूण ५ ट्रक व ७१ जिवंत लहान-मोठे म्हैस जनावरे व २ मयत म्हैस जनावरे असा एकूण ६० लाख ४० हजारांचा मुद्देमाल मिळून आला असून आरोपी वरील सात आरोपीना प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत विविध कलमा खाली अटक करण्यात आली आहे.

सदर कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी रविंद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूरचे सहायक पोलीस निरीक्षक एल. जी. वाटे. पाली उपनिरीक्षक अजित पाटील, अनिल केरूरकर, सहायक फौजदार महेशकुमार झणकर, पोलीस हवालदार ए. के. भवारी, धनंजय पालवे, महेश पटारे, भारती भवारी, दिनेश साबळे, शंकर कोबल, सुरेश गंगजे, बाळशीराम भवारी, नामदेव बांबळे, विलास कोंढावळे, नदीम तडवी, संदीप लांडे, भरत सूर्यवंशी, ज्योतीराम पवार, सुभाष केदारी, शामसुंदर जायभाये, विश्वास केदार, रोहित बोंबले, मनोजकुमार राठोड, किशोर बर्डे, आशीष जगताप विशाल गोडसे, अंबुदास काळे, राजेंद्र बनकर, सीमा काळे पोलीस मित्र शंकर अहिनवे यानी केली आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply