Pune News : SSC JE परीक्षेपासून विद्यार्थी मुकले, पुण्यातील केंद्रावर नेमकं काय घडलं

Pune News : केंद्र शासन अंतर्गत घेण्यात येणा-या स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनिअर इंजिनिअर पदासाठीच्या परीक्षेसाठी हडपसर येथील केंद्रावर येण्यास विद्यार्थ्यांना उशिर झाल्याने प्रवेशद्वार बंद करण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रवेश मिळू शकला नाही. परिणामी अनेक विद्यार्थ्यांना परीक्षेपासून मुकावे लागले.

हडपसर भागात सहयोग डिजिटल टीसीएस आयक्यूएन  या परीक्षा केंद्रावर आज स्टाफ सिलेक्शन कमिशन ज्युनिअर इंजिनिअर पदासाठीची परीक्षी हाेती. या परिक्षा केंद्रावर विद्यार्थी दूर दुरून आले होते.

Chhatrapati Sambhajinagar : संभाजीनगर हादरलं! बटण गोळ्यांच्या नशेत तरूणाचा खून; हातात चाकू, आरडाओरड करत आरोपीचा भररस्त्यात धिंगाणा

काही विद्यार्थ्यांना उशीर झाल्याने केंद्रामध्ये प्रवेश मिळाला नाही. त्यामुळे विद्यार्थी नाराज झाले. या विद्यार्थ्यांनी ट्रॅफिक आणि कामावर जाणारे लोकांची गर्दीतून वाट काढत आल्याचे सांगितले. आम्हांला 1 ते 2 मिनिटांचा उशीर झाला. परंतु कर्मचाऱ्यांनी अरेरावी करत गेट बंद केले. यामुळे आम्हांला परीक्षेपासून वंचित राहावे लागल्याची खंत विद्यार्थ्यांनी बाेलून दाखवली.
 


राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *