Pune News : बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांची बदली

Pune News :  कल्याणीनगर अपघातातील अल्पवयीन मुलाला जामीन मिळाल्यानंतर चर्चेत आलेल्या येथील बाल न्याय मंडळाच्या प्रमुख न्यायदंडाधिकारी बदली करण्यात आली आहे. कार्यकाळ पूर्ण झाल्याने ही बदली करण्यात आली आहे. एम. पी. परदेशी असे बदली झालेल्या प्रमुख न्यायदंडाधिकाऱ्यांचे नाव आहे.

मुंबई उच्च न्यायालयाच्या 'रजिस्ट्रार जनरल' यांनी न्यायाधीशांच्या बदल्यांचे आदेश सोमवारी (ता.३) काढले आहेत. त्यात परदेशी यांची मालेगाव येथे बदली करण्यात आल्याचे नमूद आहे. मंडळाचे कामकाज प्रमुख न्यायदंडाधिकारी परदेशी आणि डॉ. एल. एन. दानवडे आणि के. टी. थोरात हे दोन सदस्य पाहतात. त्यापैकी न्या. परदेशी यांचा येथील कार्यकाळ पूर्ण झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे. या बदल्या न्यायव्यवस्थेतील नियमित स्वरूपाची कार्यवाही आहे, असे सूत्रांनी सांगितले.

Pune News : सिंहगड रस्ता परिसरातील बेकायदा होर्डिंगवर कारवाई

दरम्यान अपघातावर ३०० शब्दांत निबंध लिहायचा, १५ दिवस येरवडा पोलिसांवर वाहतूक नियमनाचे काम करायचे यासह विविध अटींवर कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीन मोटार चालकाला काही तासांत जामीन देणाऱ्या बाल न्याय मंडळातील सदस्यांची चौकशी केली जात आहे. अल्पवयीन मुलाला जामीन देताना सदस्यांनी कायदेशीर बाबींचे पालन केले की नाही, याची माहिती घेतली जात आहे. सदस्यांची चौकशी करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने २२ मेला समिती स्थापन केली आहे. त्यानुसार समितीने आत्तापर्यंत अनेक कागदपत्रांची तपासणी देखील केली आहे. समितीचे प्रमुख उपायुक्त दर्जाचे अधिकारी आहेत. बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) कायद्यातील तरतुदींनुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. तिचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत सादर होण्याची शक्यता आहे.

कौटुंबिक मित्रांकडे मुलाचा ताबा द्यावा

बालसुधारागृहातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा अग्रवाल कुटुंबीयांचे कौटुंबिक मित्र असलेल्या एका कुटुंबाकडे द्यावा, असा अर्ज त्यांच्या वकिलांना सोमवारी मंडळात दाखल केला आहे. हे कुटुंबीय अग्रवाल राहत असलेल्या परिसरातच रहायला आहे. मंडळातून सुटका झाल्यानंतर मुलाचा ताबा कोणाकडे द्यायचा आहे त्यांची नावे द्यावीत, अशी सूचना मंडळाने मुलाच्या कुटुंबीयांच्या वकिलांना केली आहे. मुलाचा त्याचा रक्ताच्या नात्यातील सदस्यांकडे ताबा देता येणार नाही. त्यामुळे त्रयस्थ व्यक्तीची नावे द्यावीत, असे मंडळाने सूचित केले होते. त्यानुसार ही नावे देण्यात आली आहे.

व्यसनमुक्ती व मानसोपचाराबाबकचा आदेश मिळाला नाही

बाल न्याय मंडळाने या मुलाला जामीन मंजूर करताना व्यसनमुक्तीच्या समुपदेशनासाठी 'मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रा'कडे पाठविण्याचे आदेश दिले होता. परंतु, अद्याप त्याबाबत कोणतेही अधिकृत आदेश मिळाला नसल्याचे व्यसनमुक्ती केंद्राकडून सांगण्यात आले.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply