Pune : हडपसरमध्ये कोयता गँगची दहशत, दुकानं-वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघांना अटक

Pune : पुण्यामध्ये कोयता गँगची दहशत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशामध्ये हडपसरमध्ये कोयता गँगने दुकानांची आणि वाहनांची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी दहशत पसरवणाऱ्या कोयता गँगला अटक केली आहे. पोलिसांनी  दोघांना बेड्या ठोकल्या आहेत.

हडपसरमध्ये दुकानाची आणि वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली. तर ३ विधीसंघर्षित बालकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विजय ऊर्फ धनप्पा बसवराज कुरले (वय २२, रा. संजुदा कॉम्प्लेक्स, पापडेवस्ती, फुरसुंगी) आणि माणिक नागेश सगर ऊर्फ वाढिव बबल्या (वय १९, रा. शिवतेजनगर, काळेपडळ, फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या तरुणांची नावे आहेत. याप्रकरणी योगेश दिगंबर बुधवंत (वय २६, रा. शिवसेना भवनजवळ, माळवाडी, हडपसर) यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.

Pune Porsche Accident : अगरवाल कुटुंबीयांचे MPG Club रिसॉर्ट सील; मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर महाबळेश्वरात मोठी कारवा

हडपसरमधील भेकराईनगर येथे शंभू फॉरमेन्स दुकान आहे. या दुकानासमोर वडाच्या झाडाखाली बसण्यास विरोध केल्याने आरोपीने बेकायदेशीर जमाव जमवून लाकडी दांडके, लोखंडी धारदार शस्त्राने दुकानाच्या काचा फोडल्या. त्याचसोबत दुकानासमोरून जाणाऱ्या बसच्या काचा फोडलया आणि ढमाळवाडी येथील ७ ते ८ वाहनांची तोडफोड केली होती.

याप्रकरणी योगेश दिगंबर बुधवंत यांनी हडपसरपोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी कोयता गँगविरोधात गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. आरोपींचा तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या माहितीआधारे शोध घेऊन अटक केली. आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक बापूसाहेब खंदारे करीत आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply