Pune News : शनिवारवाड्यासमोर आढळली बेवारस बॅग! परिसरात खळबळ; बाँम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल

Pune News : पुण्यामधून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवारवाड्यासमोर बेवारस बॅग सापडल्याने एकच खळबळ उडाली. या प्रकारानंतर तात्काळ सर्व पर्यटकांना बाहेर काढून परिसर रिकामा करण्यात आला. पोलिसांसह, बाँम्ब शोध पथक घटनास्थळी दाखल झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, पुणे शहरातील ऐतिहासिक शनिवार वाड्यासमोर एक बेवारस बॅग आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. आज शनिवारची सुट्टी असल्यामुळे मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी भेट देत असतात. अशातच हा प्रकार घडल्याने भितीचे वातावरण पसरले.

Pune News : पुण्यातील आयटी कंपन्या स्थलांतरीत होणार? हिंजवडीतून 40 आयटी कंपन्यांचं स्थलांतर?

या प्रकारानंतर खबरदारी म्हणून संपूर्ण शनिवार वाड्यातील पर्यटकांना बाहेर काढून परिसर रिकामा करण्यात आला. याबाबतची माहिती मिळताच पोलीस तसेच बाँम्ब शोध आणि बाँम्ब निकामी करणारे पथक घटनास्थळीदाखल झाले आहेत. पोलीस आणि शोध पथकाकडून अधिक तपास सुरू आहे.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply