Pune News : खराडीमध्ये हाॅटेलला भीषण आग, अग्निशामक पथकाचे धाडस; 6 गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने टळला माेठा धाेका

Pune News  : खराडी (पुणे) येथी लार्गो पिझ्झा या हॉटेलमध्ये आज (शनिवार) पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखाे रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान आगीवर पूर्ण नियंत्रण मिळाले असून या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती येरवडा अग्निशमन केंद्राच्या पथकाने दिली.
 
खराडी येथील लार्गो पिझ्झा हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती ाटेच्या सुमारास मिळताच येरवडा अग्निशमन केंद्र येथून अग्निशमन दलाचे पथक पाण्याच्या टॅंकरसह रवाना झाला. हे पथक घटनास्थळी पोहोचताच त्यांनी प्रथम हॉटेलमध्ये कोणी कामगार नसल्याची खात्री हॉटेल मालकांकडून केली. त्यानंतर आगीवर पाण्याचा मारा सुरु केला. सुमारे 20 मिनिटात आगीवर नियंत्रण मिळविले. त्यानंतर पथकाने कुलिंग ऑपरेशन सुरु ठेवले.

दरम्यान हॉटेलच्या भटारखान्यातून जवानांनी सहा गॅस सिलिंडर बाहेर काढल्याने मोठा धोका टळला. तसेच वेळीच आग विझवल्याने आग इतरत्र पसरली नाही. या आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.

या आगीमध्ये दोन ओव्हन, सात फ्रिज, टिव्ही, कंप्यूटर, इलेक्ट्रीक वायरिंग व इतर साहित्य जळाले. या ठिकाणी कोणी जखमी वा जिवितहानी झाललेली नाही अशी माहिती अग्निशमन दलाच्या पथकाने दिली.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply