Pune News : मुलीच्या बालविवाह प्रकरणी आईसह पतीवर गुन्हा दाखल

Pune News : पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यात अल्पवयीन मुलीच्या बालविवाह प्रकरणी संबंधित मुलीच्या आईसह 5 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. तसेच मुलीशी विवाह करणा-यावर पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदविल्याची माहिती लोणी काळभोर पोलिसांनी दिली. 

एका 17 वर्षीय मुलीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. बालविवाहाचा प्रकार 2023 ते 2024 या कालावधीत घडला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अल्पवयीन मुलीचा विवाह तिच्या आईने एका युवकासमवेत ठरविला होता. विवाहाच्या वेळी मुलगी 16 वर्षांची होती. या विवाहाला कोणीच विरोध केला नाही.

Akola News : खळबळजनक! पोलीस हवलदाराची तक्रारदार महिलेकडे शरीरसुखाची मागणी; पोलीस अधीक्षकांकडे महिलेची तक्रार

हा विवाह परिसरातील एका मंगल कार्यालयात संपन्न झाला. विवाहानंतर आरोपी पतीने पीडिता अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील तिच्यासोबत जबरदस्तीने वेळोवेळी शारिरीक संबंध ठेवले असे पीडितेने तक्रारीत म्हटले आहे. यातून पीडिता गरोदर राहिली. प्रसूतीदरम्यान, अल्पवयीन मुलीच्या 8 महिन्यांच्या बाळाचा मृत्यू झाला.

याप्रकरणी पीडित मुलीने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर 5 जणांवर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मुलीच्या आईचा समावेश आहे तसेच पतीवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिसांनी दिली.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply