Pune News : धक्कादायक! स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या ५५० विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा; उपचार सुरू

Pune News : खेड तालुक्यातील राजगुरूनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. Jee आणि IIT परिक्षेची पुर्वतयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जेवणातून विषबाधा झाल्याचा धक्कादायक प्रकार खेड तालुक्यातून समोर आला आहे. खेड तालुक्याच्या कडूस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असून २५ विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, कडुस येथील दक्षणा फाऊंडेशनमध्ये देशातील विविध राज्यातून JEE आणि IIT अशा विविध पूर्वपरीक्षांच्या तयारी अभ्यासक्रमासाठी निवासी आहेत. काल रात्री बटाटा भाजी चपाती, डाळ भात असा जेवनाचा मेन्यू होता. ज्यातून विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचे समोर आले आहे.

Accident News: भरधाव ट्रकची ट्रॅक्टरला पाठीमागून धडक; भीषण अपघातात ४ महिलांचा जागीच मृत्यू, २४ जखमी

काल रात्री 550 विद्यार्थ्यांनी हे जेवन केले होते. ज्यामधील २५ विद्यार्थ्यांना जुलाब, उलटीचा त्रास जाणवू लागला. विद्यार्थ्यांना त्रास होऊ लागल्यानंतर या सर्व विद्यार्थ्यांना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, हा प्रकार समोर आल्यानंतर राजगुरुनगर पोलिसांसह डॉक्टरांची टिम चांडोली ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली आहे. काही मुलांना ऑक्सिजन लावण्यात आले असून 3 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. विषबाधा झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply