Pune News : स्वारगेटला निघालेल्या एसटी बसला अपघात, 20 प्रवासी जखमी

Pune News : पनवेल मधील खांदा कॉलनी जवळ प्रवाशांनी भरलेल्या एसटी बसचा अपघात झाल्याची घटना आज (शुक्रवार) दुपारच्या सुमारास घडली. या अपघातात जवळपास 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पाेलिस घटनेचा तपास करीत आहेत.

प्राथमिक माहितीनूसार एसटी बस जव्हार वरून स्वारगेटला निघाली होती. बस खांदा कॉलनी जवळ आली असता एका वाहनाला बसने पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातात बसचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले. या घटनेत बसमधील 15 ते 20 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. सर्व जखमी प्रवाशांना एमजीएम रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. 

Arvind Kejriwal : ४८ दिवसात एकदा प्रसाद अन् ३ वेळा आंबे; केजरीवाल यांच्या खाण्यावरून कोर्टात आरोप प्रत्यारोप

पामबीच मार्गावर भीषण अपघातनवी मुंबईतील पामबीच मार्गावर भीषण अपघात झाला आहे. बेलापुर वरून वाशीच्या दिशेने जाताना सानपाडा जवळ कार वरील नियंत्रण सुटल्याने कार दुभाजक तोडून झाडाला धडकली. या कार मधील वाहन चालक जखमी झाला आहे. त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार कार चालकाचे नाव अखिल पिल्लाई असे आहे. अधिक तपास पाेलिस करीत आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply