Pune : पिंपरी-चिंचवडमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा

पुणे : आशिया खंडातील सर्वाधित गतीने विकसित होणाऱ्या पिंपरी-चिंचवड शहरातील विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. तसेच, आंद्रा प्रकल्पांतर्गत चिखली येथील १०० एमएलडी जलशुद्धीकरण केंद्रासह १६ प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाच्या वतीने सोमवारी, दि. १५ मे रोजी सकाळी ११ वाजता विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा होणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार महेश लांडगे, खासदार सुप्रिया सुळे, श्रीरंग बारणे, अमोल कोल्हे, आमदार अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, उमा खापरे, संग्राम थोपटे, दिलीप मोहिते यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

महापालिका प्रशासकीय भवनाचे भूमिपूजन आणि आंद्रा प्रकल्पातील चिखली जलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण प्रत्यक्ष होणार असून, उर्वरित प्रकल्पांचे ऑनलाईन लोकार्पण व भूमिपूजन होईल. त्यासाठी आकुर्डी येथे नव्याने उभारण्यात आलेल्या ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात कार्यक्रम होणार आहे. विशेष म्हणजे, या नाट्यगृहात पहिलाच कार्यक्रम उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत होत आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply