Pune News : वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश देण्याचे आमिष; ७० लाखात फसवणूक

Pune News : पुण्यातील एका नामवंत महाविद्यालयात वैद्यकीय अभ्यासक्रमाला मुलाचा प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्याच्या कसबा परिसरातील ज्येष्ठ नागरिकाची ६९ लाख ७० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

पुण्यातील कसबा पेठ परिसरात वास्तव्यास असलेल्या तक्रारदार ज्येष्ठ नागरिकाने कसबा पेठेत राहायला आहेत. त्यांचा मुलास वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश हवा होता. यामुळे ते महाविद्यालयात  फिरत तपास करत होते. दरम्यान साधारण वर्षभरापूर्वी त्यांची ओळख सुनील गडकर याच्याशी एका परिचितामार्फत झाली होती. त्यावेळी गडकरने नामवंत वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवून देण्याचे आमिष तक्रारदारांना दाखविले होते. यावर त्यांनी विश्वास ठेवला. 

Navapur Hill Fire : नवापूर तालुक्यातील माकडदरीच्या डोंगराला आग; दोन दिवसांपासून वणवा पेटलेला

गडकर यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी सांगितल्याप्रमाणे तक्रारदाराने प्रवेशासाठी ६९ लाख ७० हजार इतकी रक्कम गडकर यास दिली. मात्र वर्ष होऊन देखील प्रवेश मिळाला नाही. पैशांची मागणी केल्यानंतर रक्कम देखील परत मिळाली नाही. याप्रकरणी ज्येष्ठ नागरिकाने विश्रामबाग पोलीस  ठाण्यात फिर्याद दिली असून सुनील नामदेव गडकर (वय ३२, रा. गणेशयोग सोसायटी, आंबेगाव बुद्रुक) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply