Pune News : उन्हामुळे पिक जळालं; कर्जबाजारीपणाला कंटाळून 45 वर्षीय शेतकर्‍याची आत्महत्या, परिसरात हळहळ

Pune News : लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील एका 45 वर्षीय शेतकर्‍याने आत्महत्या केली आहे. कर्जबारीपणाला कंटाळून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. त्यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रुपनरवस्ती परिसरात घडली आहे. या घटनेमुळे लोणी काळभोर परिसरात शोककळा पसरली आहे.

मल्हारी महादू रुपनर (वय 45, रा. रुपनरवस्ती, लोणी काळभोर) असं आत्महत्या केलेल्या शेतकर्‍याचं नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारी रुपनर यांचा प्रमुख व्यवसाय शेती आहे.  शेती व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतु शेती करण्यासाठी भांडवल नसल्यामुळे त्यांनी काही लोकांकडून पैसे घेतले होते. तसंच सोसायटीमधून कर्जही उचलले होते.

Bar Council Of India : परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या प्रवेशावर बंदी; RTI मधून धक्कादायक माहिती समोर

मल्हारी रुपनर हे सकाळी नेहमीप्रमाणे शेतात काम करण्यासाठी गेले होते. काम करून दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास ते घरी आले. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मल्हारी रुपनर हे घरात दिसले नाही. त्यामुळे मल्हारी यांची पत्नी व मुलीने त्यांचा शोध घेतला असता, मल्हारी रुपनर हे बाथरूमच्या खिडकीला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

मल्हारी रुपनर यांनी शेती करण्यासाठी सोसायटीचे व हात उसने स्वरूपात अनेक लोकांकडून कर्ज घेतले होते. त्या पैशातून त्यांनी शेतात मेथी व कोथिंबीर लावली होती. मात्र, उन्हाळ्यामुळे शेतातील पीक जळून गेलं होते. त्यांना कोणतंही उत्पन्न मिळणार नव्हतं. आर्थिक चणचण आणि कर्जबाजारीपणाली कंटाळून त्यांनी टोकाचा निर्णय घेतला. त्यांनी गळफास घेऊनजीवन संपवल्याचं समोर आलं आहे.

नागपूरमधील घटना

नागपूरमध्ये ७ एप्रिल रोजी एका एसआरपीएफच्या जवानाने आत्महत्या केली होती. त्याने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून जीवन संपवलं होतं. एसएलआरने फायर करून एसआरपीएफ ग्रुप नंबर चारच्या ड्रील इन्स्पेक्टरने आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. डी पोलीस ठाण्यांतर्गत शनिवारी ही घटना घडली होती. मंगेश मस्की, असं आत्महत्या केलेल्या  एसआरपीएफ जवानाचं नाव होतं. तो सुराबर्डी येथील युओटीसी केंद्रात कार्यरत होता. कुटुंबात पत्नी आणि दोन मुले असून त्याची पत्नीही वाडी पोलीस ठाण्यात कार्यरत होती.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply