Pimpri : मालमत्ता करातून महापालिका मालामाल; ९१० कोटी तिजोरीत

Pimpri : महापालिका तिजोरीत मालमत्ता करातून ९१० कोटी रुपये जमा झाले आहेत. एक हजार कोटी रुपयांचे उदिष्ट पूर्ण करण्यासाठी शेवटच्या तीन दिवसांत ९० कोटी वसूल करण्याचे आव्हान कर संकलन विभागापुढे असणार आहे. शुक्रवार, शनिवार आणि रविवार सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत कर संकलन कार्यालये खुली राहणार आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरात मालमत्ताधारकांना कर भरण्यासाठी १७ विभागीय कार्यालये आणि ऑनलाइनची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. आत्तापर्यंत ९१० कोटी रुपयांचा कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे. एक हजार कोटी रुपयांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळजोड खंडित करणे, जप्त मालमत्तांचा लिलाव यासारख्या कारवाया केल्या जात आहेत. आज (२९ मार्च) शुक्रवारी गुड फ्रायडे आणि शनिवार, रविवार महापालिकेला शासकीय सुट्टी आहे. मात्र, या तिन्ही दिवशी नागरिकांच्या सोयीसाठी कर संकलन कार्यालये सकाळी साडेनऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत खुली राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांना कराचा भरणा करता येणार असल्याची माहिती सहायक आयुक्त नीलेश देशमुख यांनी दिली.

Chakan Crime News : चाकणच्या तोतया पोलीस अधिकाऱ्याला पनवेलला अटक



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply