Pune : 'यशवंत'च्या चेअरमनपदी सुभाष जगताप; व्हाईस चेअरमनपदी मोरेश्वर काळे

Pune: थेऊर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी अण्णासाहेब मगर विकास‌ आघाडीचे नवनिर्वाचित संचालक सुभाष चंद्रकांत जगताप यांची तर व्हाईस चेअरमनपदी मोरेश्वर पांडुरंग काळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शितल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कारखाना स्थळावर झालेल्या नवनिर्वाचित संचालक मंडळाच्या पहिल्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

चेअरमन व व्हाईस‌ चेअरमनची निवड झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून व फटाके फोडून जल्लोष केला. गेली तेरा वर्ष प्रशासकाच्या ताब्यात असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक न्यायालयाच्या आदेशानुसार घेण्यात आली.

Kota Student: कोटामध्ये चाललंय काय? NEET ची तयारी करणाऱ्या विद्यार्थिनीने संपवलं जीवन; तीन महिन्यांमध्ये 8 प्रकरणं समोर

राजकीय मंडळींच्या हेव्यादाव्यामुळे आणि वादांमुळे कारखाना प्रशासकाच्या ताब्यात गेला. ही बाब लक्षात घेवून कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, यासाठी सुरुवातीला सर्वपक्षीय नेत्यांनी प्रयत्न केले.

मात्र, या प्रयत्नांना यश आले नाही आणि अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडी आणि अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेल या दोन पॅनलमध्ये निवडणूक रंगली. या निवडणुकीत कारखान्याच्या सभासदांनी हवेली बाजार समितीचे माजी सभापती प्रताप गायकवाड, बाजार समितीचे संचालक व माजी सभापती प्रकाश जगताप,

बाजार समितीचे संचालक प्रशांत काळभोर आणि हवेली पंचायत समितीचे माजी सदस्य बाळासाहेब चौधरी, यशवंतचे माजी संचालक पांडुरंग काळे यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीवर विश्वास दाखवत २१ पैकी १८ संचालक निवडून दिले.

तर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर व बाजार समितीचे विद्यमान सभापती दिलीप काळभोर यांच्या नेतृत्वाखालील अण्णासाहेब मगर रयत सहकार पॅनेलला अवघ्या तीन जागांवर समाधान मानावे लागले.

यानंतर कारखान्याचे चेअरमन व व्हाईस चेअरमन निवडण्यासाठी बुधवारी कारखान्यावर निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. शितल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित संचालक मंडळाची बैठकीत झाली.

यावेळी चेअरमन पदासाठी सुभाष जगताप आणि व्हाईस चेअरमन पदासाठी मोरेश्वर काळे या दोघांचेच अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जगताप व मोरे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. या निवडीनंतर कार्यकर्त्यांनी व सभासदांनी गुलाल उधळून आणि फटाके फोडून जल्लोष केला.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply