Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघात उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजीनाट्य

Pune News : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर आता भाजपकडून अन्य इच्छुक उमेदवारांशी नाराजी दूर करण्याचे प्रयत्न सुरु केले आहेत. दरम्यान, गुरुवारी मोहोळ यांनी काढलेल्या देवदर्शनासाठी काढलेल्या रॅलीमध्ये इच्छुकांनी अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरला होता.

भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने पुण्यातून मोहोळ यांना बुधवारी (ता. १३) उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर त्यांनी आज सकाळी ग्रामदैवत कसबा गणपती येथे दर्शन घेऊन त्यांच्या प्रचाराचा नारळ फोडला. त्यानंतर दिवसभरात शहरातील विविध स्मारकांना भेटी देऊन महापुरुषांना अभिवादन केले.

Indrayani River Polluted : प्रदुषित इंद्रायणी नदीत मृत माशांचा खच, प्रशासन आजही ढिम्म

यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, शिवसेनेचे शहर प्रमुख नाना भानगिरे, अजय भोसले, रिपाइचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, परशुराम वाडेकर, शिवसंग्रामचे भरत लगड, विष्णू कसबे, संजय आल्हाट, लोकसभा प्रभारी श्रीनाथ भिमाले, प्रदेश उपाध्यक्ष राजेश पांडे, गणेश बिडकर, हेमंत रासने आदी उपस्थित होते.

मोहोळ यांनी एकीकडे ही रॅली काढली असली तरी त्यापूर्वी त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांना फोन करून संपर्क साधला होता. शहराध्यक्षांकडून रॅलीला उपस्थित राहण्यासाठी निरोपही पाठवला होता. पण जगदीश मुळीक, संजय काकडे यांच्यासह त्यांचे समर्थकही या रॅलीकडे फिरकले नाहीत. त्यामुळे मोहोळ यांच्या उमेदवारीवरून पक्षात नाराजी असल्याचे स्पष्ट झाले.

शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, ‘उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मोहोळ यांनी लगेच इतर इच्छुकांशी संपर्क साधून त्यांचे आभार मानले आहेत. त्यांना आजच्या कार्यक्रमाबद्दलचा निरोप रात्री उशिरा दिला गेल्याने ते उपस्थित राहू शकले नसावेत. पण भाजपमध्ये उमेदवारीवरून कोणतीही नाराज नाही, पुढील एक दोन दिवसात सर्वजण एकत्र आहोत.

 


मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply