Pune News : पुणे विमानतळापर्यंत मेट्रो नाहीच; प्रस्ताव अव्यवहार्य असल्याचा महामेट्रोचा दावा

Pune News :  पुणे विमानतळापर्यंत मेट्रो सेवेचा विस्तार करावा, अशी मागणी पुणेकरांकडून केली जात आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही याबाबत महामेट्रोला सूचना केली होती. मात्र, विमानतळापर्यंत मेट्रो नेणे शक्य नसल्याचे महामेट्रोने स्पष्ट केले आहे. भविष्यात विमानतळाला जोडण्यासाठी एखाद्या नवीन मार्गिकेचे नियोजन करण्याबाबत विचार सुरू असल्याचेही महामेट्रोचे म्हणणे आहे.

पुणे मेट्रोच्या सेवेचा विस्तार आता रामवाडीपर्यंत होत आहे. यामुळे रामवाडीतून पुणे विमानतळापर्यंत मेट्रो न्यावी, अशी मागणी पुणेकरांसह राजकीय नेत्यांकडून केली जात आहे. याबाबत उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सूचना केली होती. त्यानंतर महामेट्रोने या प्रस्तावाची व्यवहार्यता तपासली होती. त्यात रामवाडीतून विमानतळापर्यंत मेट्रोचा थेट विस्तार शक्य नसल्याची बाब समोर आली. त्यामुळे मेट्रोने हा प्रस्ताव आता रद्द केला आहे.

Pune News : मॉडेलिंगसाठी मैत्रिणीला नेल्याने तरुणावर कोयत्याने वार

महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळापर्यंत मेट्रोची सेवा नेण्यासाठी आधीपासूनच नियोजन व्हायला हवे होते. एकदा मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर तिचा विस्तार कशा पद्धतीने करावयाचा यावर मर्यादा येतात. रामवाडीतून थेट विमानतळाकडे सुमारे दोन किलोमीटरच्या अंतरासाठी मेट्रो वळविणे शक्य नाही. भविष्यात एखादी नवीन मार्गिका विमानतळासाठी करावी लागेल. परंतु, आजच्या घडीला मेट्रो विमानतळापर्यंत नेणे अशक्य आहे.

 



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply