Pune News : दोन महिने उत्पादन शुल्क विभागाची धडाधड छापेमारी; अवैध दारूसह सुमारे 2 कोटी 82लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

 

Pune News : पुण्यातील डेक्कन  परिसरातील आर डेक्कन येथील इमारतीसमाेर आज (बुधवार) सांयकाळच्या सुमारास शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी भाजप नेते निलेश राणेंच्या विरोधात "बँड बाजा" आंदोलन छेडले आहे. या आंदाेलनाची खूमासदार चर्चा परिसरात सुरु आहे.

पुणे महापालिका प्रशासन थकीत मिळकतकर वसूल करण्यासाठी बड्यांसह छाेट्या थकबाकीदारांवर कारवाई करीत आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी सव्वा महिना शिल्लक असताना प्रशासनापुढं सुमारे 400 कोटी रुपये वसूल करण्याचे आव्हान आहे.

Water Shortage : पाण्यासाठी ग्रामस्थ आक्रमक; सरपंचासह सदस्यांना कोंडले ग्रामपंचायत कार्यालयात

आज महापालिकेने आर डेक्कन परिसरात भाजप नेते निलेश राणेंची मिळकत सील केली. पुणे महापालिकेने दिलेल्या माहितीनूसार निलेश राणेंची तीन कोटी ७७ लाख ५३ हजार रुपयांची मालमत्ता कराची थकबाकी आहे. यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

दरम्यान निलेश राणेंकडून थकीत रक्कम लवकर वसूल व्हावी यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते मैदानात उतरलेत. त्यांनी आज आर डेक्कन परिसरातील राणेंच्या इमारतीसमाेर जात बँड वाजविला.



विडियो गॅलेरी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *