Pune : औद्योगिक सुरक्षा विभागावर प्रश्‍नचिन्ह ; कुरकुंभ येथील अमली पदार्थ जप्ती प्रकरण, दोषींवर कडक कारवाईची मागणी

कुरकुंभ : दौड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अर्थकेम लॅब्रोटरीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत मेफेड्रोन या अमली पदार्थाचे उत्‍पादन होत असल्‍याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यामुळे औद्योगिक विकास व प्रदूषण नियंत्रण महामंडळ आणि औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालय विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. याबाबत सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

कंपनीतून पोलिसांच्या गुन्हे शाखेने काही महत्त्वाची कागदपत्रे व संगणक जप्त केला आहे. या कारवाईनंतर बुधवारी अर्थकेम कंपनीत अमली पदार्थ विरोधी विभागाच्या व प्रादेशिक न्यायवैद्यक प्रयोगशाळेच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन चौकशी केल्याची माहिती सुरक्षा कर्मचाऱ्यांनी दिली.

Mulshi Dam : मुळशीकरांचा पाण्याचा प्रश्न मिटणार; मुळशी धरण परिसरातील भागाला अतिरिक्त पाणी मिळणार

तसेच अमली पदार्थाचा साठा सापडलेल्या कंपनीत औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे उपसंचालक अंकुश खराडे यांनी भेट देऊन पाहणी केली. याबाबत माहिती देताना उपसंचालक खराडे म्हणाले, ‘‘अर्थकेम लॅब्रोटरीज कंपनीचे मालक भीमाजी परशुराम साबळे यांच्या औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नं. ए ६३ मधील कंपनीच्या उत्पादनाबाबत २०२१ नंतर अर्ज न केल्याने त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र कारखाने नियमांतर्गतच्या कायद्याचा भंग केल्याने शिवाजीनगर येथील न्यायालयात २९ मार्च २०२२ रोजी खटला दाखल करण्यात आला आहे.

याबाबत न्यायालयीन प्रक्रिया चालू असून १४ मार्च २०२४ रोजी पुढील तारीख आहे. याच कंपनीच्या प्लॉट नं. ए. ६३ च्या बाजूलाच अमली पदार्थ साठा सापडलेला अर्थकेम कंपनीचा प्लॉट नं. ए. ७० हा भीमाजी साबळे यांच्या मालकीचा आणखी एक प्लॉट आहे. त्यामध्ये कोणतीही परवानगी न घेता बेकायदा मेफेड्रोन या अमली पदार्थाचे उत्पादन व साठा केला जात होता, असा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply