Pune News : मुंबईसह, पुण्यात साखळी बॉम्बस्फोट होणार; पोलीस नियंत्रण कक्षाला फोन, यंत्रणांमध्ये खळबळ

Pune News : मुंबईसह पुण्यात साखळी बॉम्बस्फोट होणार, असा फोन शुक्रवारी (१६ फेब्रुवारी) पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला आला. यामुळे यंत्रणांमध्ये एकच खळबळ उडाली. पोलिसांनी या फोन कॉलची गंभीर दखल घेत पुणे पोलिसांना सतर्क केले. मात्र, कुठलीही संशयित हालचाल आढळून न आल्याने पोलिसांनी फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे.

नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास पुणे पोलीस नियंत्रण कक्षाला एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला. मुंबईसह पुण्यातील काही भागात साखळी बॉम्बस्फोट होणार, अशी माहिती या व्यक्तीने पोलिसांना दिली. 

Dhangar Reservation : ब्रेकिंग! धनगर आरक्षणाची मागणी फेटाळली; हायकोर्टाचा सर्वात मोठा निर्णय

मुंबईतील वांद्रे आणि गेट वे ऑफ इंडिया आणि पुण्यातील शिवाजीनगर आणि पिंपरी चिंचवड परिसरात लवकरच बॉम्बस्फोट होईल, असं अज्ञाताने पोलिसांना सांगितलं. तुम्ही कोण आणि कुठून बोलत आहात? अशी विचारणा पोलिसांनी केल्यानंतर अज्ञाताने फोन कट करून टाकला.

दरम्यान, पुणे पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेत मुंबई पोलिसांना सतर्क केले. शुक्रवारी दिवसभर पाळत ठेवल्यानंतर संबधित भागात कुठलीही संशयित हालचाल आढळून आली नाही. त्यामुळे हा फोन कॉल फेक असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं.

याप्रकरणी पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून फोन करणाऱ्या व्यक्तीचा शोध सुरू केला आहे. मुंबई तसेच पुणे पोलिसांना असे फोन कॉल येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील मुंबईत बॉम्बस्फोट होणार अशा आशयाचे फोन पोलिसांना आले आहेत.



राजकीय

मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply