Pune News : कर्नाटकातील कुख्यात डीएमसी टोळीचा प्रमुख पुणे पोलीसांच्या ताब्यात

Pune News : कर्नाटकमधील कुख्यात डीएमसी टोळीच्या प्रमुखाला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गुंड मड्डु हिरेम्हठला पुण्याच्या पर्वती  पोलिसांनी तीन पिस्तूल व २५ जिवंत काडतुसासह पुण्यात पकडले आहे.  या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.

उत्तर कर्नाटकाच्या भीमा तीरेवरती डीएमसी टोळी आणि महादेव बहिरगुंडा या टोळीचे वाद आहेत. टोळीच्या वादामध्ये अनेक जणांच्या मृत्यू झाला आहे. दरम्यान डीएमसी टोळीतील आरोपी मड्डू उर्फ माडवेलिया हिरेमठ हा पुण्यातील स्वारगेट परिसरातील लक्ष्मीनारायण थिएटर या परिसरातील येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार  पोलिसांनी परिसरात सापळा रचला. 

Maharashtra Politics : पक्ष सोडणाऱ्यांना जनता स्वीकारणार नाही; काँग्रेस प्रभारींचा अशोक चव्हाणांवर संताप

पाठलाग करत पकडले 

वर्चस्व वादाच्या स्वरक्षणासाठी मड्डू हा सध्या पुण्यात वास्तव्यास होता. मिळालेल्या माहितीनुसार स्वारगेट परिसरात पोलिसांनी आरोपी आणलेल्या पांढऱ्या गाडीला थांबवण्याचा इशारा दिला. यावेळी आरोपीने गाडी पळविण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पाठलाग करून आरोपींची गाडी पकडली असता आरोपीकडे ३ पिस्टल आणि २५ काडतुसे सापडले आहेत.  मड्डू हिरेमठ याच्यावरती विजापूर जिल्ह्यासह कर्नाटकमध्ये खून व खुनाचे प्रयत्न यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.



मनोरंजन

विडियो गॅलेरी

Leave a Reply