Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे चिन्ह अजित पवार यांना मिळाल्यानंतर अजित पवार समर्थकांकडून डेंगळे पुलाजवळील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय ताब्यात घेण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. त्यावरून अजित पवार आणि शरद पवार गट आमने-सामने आले असून, कार्यालय बळकाविण्याचा प्रयत्न झाल्यास न्यायालयीन दाद मागण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाने दिला आहे.राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर पक्ष आणि पक्षाचे घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवार यांच्या ताब्यात देण्याचा निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे.
त्यानंतर अजित पवार आणि शरद पवार गटांनी एकमेकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शरद पवार गटाकडून अजित पवार यांचे नाव असलेली कोनशिला फोडण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी कार्यालय ताब्यात घेण्याचा इशारा दिला होता. कार्यालयात झालेली तोडफोड आणि कार्यालयाचा ताबा घेण्याचा इशारा या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालय परिसरात गुरुवारी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Delhi Metro Slab : मेट्रो स्टेशनचा स्लॅब रस्त्यावर कोसळला; काहीजण ढिगाऱ्याखाली दबले, बचावकार्य सुरू |
‘राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यालय तीन वर्षांपूर्वी नव्या जागेत सुरू करण्यात आले. त्या जागेचा करार पक्षाच्या नव्हे, तर शहराध्यक्ष म्हणून माझ्या नावावर आहे. करारनामा रजिस्टर असून, जागेचे भाडेही माझ्या बँक खात्यातून देण्यात येत आहे. त्यामुळे कार्यालयावर दावा करणे अयोग्य आहे. मात्र त्यानंतरही असा प्रयत्न झाल्यास पोलीस आणि न्यायालयाकडे दाद मागण्यात येईल,’ असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी सांगितले.राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतरही हा कार्यालयाचा ताबा कोणाकडे यावरून वाद निर्माण झाला होता. त्यानंतर हा वाद मागे पडला होता. पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांनी मिळाल्यानंतर हा वाद पुन्हा सुरू झाला आहे.
शहर
महाराष्ट्र
- Sunetra Pawar : “सगळा आकड्यांचा खेळ…”, अजित पवार मुख्यमंत्री होण्याबाबत सुनेत्रा पवारांची प्रतिक्रिया
- Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...
- Maharashtra Assembly Election : आता मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण? देवेंद्र फडणवीस की एकनाथ शिंदे ?
- Maharashtra Election Result : महाराष्ट्रात मॅजिक! महायुती २०० पार, मविआ ५० वर अडकले; सुरुवातीचा कल आघाडीच्या विरोधात
गुन्हा
- Pune : जमिनीच्या वादातून चुलत भावाला मोटारीखाली चिरडण्याचा प्रयत्न, शिरुरमधील केंदूर गावातील घटना
- Pune : गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची दोन कोटींची फसवणूक, वरद प्राॅपर्टीजच्या संचालकांविरुद्ध गुन्हा
- Pune Crime : पुण्यातील चितळे बंधूंच्या दुकानावर दरोडा; चोरीची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
- Pune Crime : दांडेकर पूल परिसरात प्रेमप्रकरणातून तरुणाचा खून, शहरात दोन दिवसात तीन खून
राजकीय
- Maharashtra Politics : विधानसभेपूर्वी मुंबईत काँग्रेसला मोठा धक्का, रवी राजा यांनी भाजपमध्ये केला प्रवेश
- Maharashtra Politics : किशोर जोरगेवार यांचा अखेर भाजपामध्ये प्रवेश, विरोध करणाऱ्या सुधीर मुनगंटीवार यांनीच केलं स्वागत
- Maharashtra Politics : मुंबई, नांदेडनंतर पुण्यात ठाकरे गटात नाराजी; इच्छुक बंडखोरीच्या तयारीत
- NCP Candidate List : अजित पवारांच्या राष्ट्रवादीची तिसरी यादी जाहीर, नवाब मलिक यांच्या नावाची घोषणा नाहीच
इतर
- Aastad Kale : 'राजन नावाचे क्रिमिनल आहेतच की', मुलाचं नाव जहांगीर ठेवल्यामुळे चिन्मय मांडलेकरच्या ट्रोलिंगवर आस्ताद काळेचं स्पष्ट मत
- Ashok Saraf : नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार अभिनेते अशोक सराफ व रोहिणी हटंगडी यांना जाहीर
- Neena Gupta Interview : 'पैशांसाठी मी तशा भूमिका केल्या, देवाकडे प्रार्थना करायची की...' अभिनेत्रीने स्ट्रगलच्या दिवसांतील मांडली व्यथा
- Munawar Faruqui : 'बिग बॉस १७' विनर मुनव्वर फारुकीची प्रकृती बिघडली, रुग्णालयात उपचार सुरू; नेमकं काय झालं?
मनोरंजन
- Anant Ambani Wedding Budget : काय सांगता? अंबानींच्या एका लग्नाच्या बजेटमध्ये पाच सेलिब्रिटींचं लग्न; अनुष्का,दीपिका, प्रियंकाही पडल्या मागे
- बिग बॉस’ फेम अब्दु रोजिकने उरकला १९ वर्षीय अमीराशी साखरपुडा; आनंदाची बातमी देत शेअर केले खास फोटो
- राजकुमार रावच्या ‘श्रीकांत’ची जबरदस्त सुरुवात, कोण आहे ५०० कोटींची कंपनी उभारणारा नेत्रहीन उद्योजक? जाणून घ्या
- ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’पेक्षा निलेश साबळेच्या नव्या कार्यक्रमाला प्रेक्षकांच्या चांगला प्रतिसाद, टीआरपीच्या यादीत ‘या’ स्थानावर
विडियो गॅलेरी
देश विदेश
- Shashi Tharoor On Delhi : “दिल्ली देशाची राजधानी राहावी का?” शशी थरूर यांचं थेट मुद्द्यावर बोट, म्हणाले, “या शहरात…”
- Desh Videsh : मराठीला अभिजात भाषेचा दर्जा दिल्याबद्दल नायजेरियातील मराठी भाषिकांनी मानले पंतप्रधान मोदींचे आभार
- New Delhi : दत्तक मूल तीन महिन्यांपेक्षा मोठे असल्याने मातृत्व रजा नाकारली ; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राकडे मागितले उत्तर
- Lucknow : ‘बुलडोझर दहशत’, ‘जंगल राज’ संपेल! निकालाचे विरोधी पक्षांकडून स्वागत; सरकारची सावध प्रतिक्रिया